Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

माजी नगरसेवकावर सत्तुरने प्राणघातक हल्ला



प्रकृती चिंताजनक

राजुरा :- रामपूर परिसरात राजुरा नगर पालिकेचे माजी नगरसेवक विलास तुमाने ह्यांचेवर सत्तुरने प्राणघातक हल्ला करण्यात आला असुन त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
माजी नगरसेवक विलास तुमाने ह्यांचे लहान भाऊ राहुल ह्याचे रामपूर परिसरात मांस विक्रीचे दुकान आहे. त्याच्या शेजारीच दुर्गे नामक इसमाचे सुद्धा दुकान असुन त्यांच्यात बर्‍याच दिवसांपासुन वाद सुरू आहेत. मुख्य म्हणजे दोन्ही दुकानदार एकमेकांचे शेजारी असुन दोघांचीही घरे सुद्धा चुनाभट्टी वॉर्ड राजुरा परिसरात लागूनच आहेत.




आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास विलास तुमाने ह्यांचे लहान भाऊ राहुल यांच्या शेजारचा दुकानदार दुर्गे ह्याचेशी वाद झाला त्यामुळे राहुल ह्याने विलास तुमाने ह्याला दुकानात बोलावले. तिथे त्यांच्यात परत वाद झाला. दरम्यान दुर्गे नामक दुकानदाराने विलास तुमाने ह्यांचे वर सत्तुरने सपासप वार केल्यामुळे त्यांचा गाल कापल्या गेल्याची चर्चा असुन सत्तुरचा वार गळ्यावर सुद्धा झालेला आहे. तर प्राप्त माहितीनुसार आरोपी दुर्गे बंधूंना सुद्धा दुखापत झाली असुन त्यांना हातावर टाके घालण्यात आल्याचे समोर येत आहे.

जखमी अवस्थेत असलेल्या माजी नगरसेवक विलास तुमाने ह्यांना राजुरा येथिल उपजिल्हा रुग्णालयातून प्राथमिक उपचार करून चंद्रपूर येथे पाठविण्यात आले. खाजगी रुग्णालयाने प्रकृती बघता शासकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सावंगी येथिल वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies