Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

जादुटोणा केल्यानं कॅन्सर झाल्याचा आरोप करीत चौघांना बेदम मारहाण
चंद्रपूर :- बुवाबाजी जादूटोणाचा चंद्रपूर जिल्ह्याला विळखा बसत असल्याचं धक्कादायक चित्र, चंद्रपूर जिल्ह्यात उजेडात येऊ लागलं आहे.जिल्ह्यातील वाढत्या अंधश्रद्धेच्या घटनांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी जिवती तालुक्यातील वणी खुर्द येथे जादूटोणा केल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी गावातील चार वृद्धांना हात-पाय बांधून मारहाण केली. ही घटना ताजी असताना नागभीड तालुक्यातील मिंडाळा गावात जादूटोण्याच्या संशयावरून बहीण-भाऊ आणि त्यांच्या आईला मारहाण करण्यात आली होती. (Chandrapur city)

या सर्व घटना ताज्या असताना आज चंद्रपूर शहरातील भिवापूर वॉर्डातील एकाच कुटुंबातील चौघांना जादुटोणा केल्याच्या संशयावरून मारहाण करण्यात आल्याची घटना उघडकीस आली.याप्रकरणी शहर पोलिसांनी सहा जणांना अटक केली. अटकेतील सगळ्या आरोपींना शनिवारी न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.(Alleged to have got cancer due to witchcraft in Chandrapur)

सविस्तर वृत्त असे की चंद्रपूर शहरातील भिवापूर वॉर्डात नारायण पदेमवार आणि राम पदेमवार कुटुंबीय राहतात. हे दोघेही भाऊ आहेत. गेल्या काही महिन्यांपासून राम पदेमवार यांना मुखाचा कर्करोग झाला होता. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. मात्र, आजार कमी होत नसल्याचे पाहून त्यांनी मांत्रिकाचे घर गाठले होते.(All four were beaten to death on suspicion of practicing witchcraft)

कर्करोगाला तुमच्या परिवारातील काहीजण कारणीभूत असल्याचे वारंवार मांत्रिकाने सांगितले होते. तेव्हापासून रामू पदमेवार यांचा नारायण पदेमवार यांच्यावर संशय वाढला होता.

शुक्रवारी (ता.३) सकाळी रामू पदेमवार यांच्या काही नातेवाईकांनी नारायण पदेमवार यांचे घर गाठले. जादुटोणा केल्यामुळे राम पदेमवार यांना कर्करोग झाल्याचे सांगून आशालू पदेमवार, सिनू रादंडी, रवी आशावर, मंगेश पदमेवार यांनी पूजा नारायण पदमेवार, नारायण पदमेवार, भाऊ आणि बहिणीस बेदम मारहाण केली.

या प्रकारानंतर पूजा पदमेवार हिने शहर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. प्रारंभी पोलिसांनी हे प्रकरण गांर्भीर्याने घेतले नाही. मात्र, अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सदस्यांच्या कानावर हा प्रकार आला. त्यांनी शहर पोलिस स्टेशन गाठले.

त्यानंतर पोलिसांनी परत पीडित कुटुंबीयांना बोलावून त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. त्यानंतर आशालू पदेमवार, सिनू रादंडी, रवी आशावर, मंगेश पदमेवार यांच्यासह एकास अटक केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies