Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

चंद्रपूर शहरातील गौतमनगर येथे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

राजस्थान, मध्यप्रदेश, तेलंगना राज्यातील तीन मुलींची सुटका तर 2 महिला आरोपींना अटक


चंद्रपुर :- शहरात मागील काही दिवसापासून गौतम नगर येथे अनैतीक देहविक्री चालु असल्याबाबत तकारी पोलीस अधिक्षक अरविद साळवे यांना प्राप्त झाल्या होत्या. त्याअनुशंगाने जिल्हा पोलीस अधिक्षकानी पोलीस निरीक्षक श्री. बाळासाहेब खाडे यांना पथक तयार करण्याचे निर्देश दिले.त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री. बाळासाहेब खाडे यांनी पथक गठित करून आज चंद्रपुर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गौतम नगर येथे स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने कार्यवाही केली या कारवाईत दोन स्त्रीया या परराज्यातील मुलींकडून आर्थीक फायदया करीता देहव्यापार करवून घेताना मिळुन आल्याने त्यांना महिला पोलीसांच्या मदतीने ताब्यात घेवून त्यांचे कडुन राजस्थान, मध्यप्रदेश, तेलगना या परराज्यातील तीन पिडीत मुलींची सुटका करून त्यांना स्त्री आधार गृह चंद्रपुर येथे दाखल करण्यात आले सदर कार्यवाहीत दोन आरोपी महीला विरोधात चंद्रपुर शहर पोलीस स्टेशन येथे कमाक 370 370 (ए) 371 सह कलम 3 4 5 6 7 अनैतीक मानवी व्यापार प्रतीबंधक अधिनीयम 1956 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हयाचा पुढील तपास चंद्रपुर शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी करीत आहे.

सदरची यशस्वी कामगोरी मा. श्री. अरविंद साळवे पोलीस अधिक्षक चंद्रपुर अप्पर पोलीस अधिक्षक श्री. अतुल कलकर्णी यांचे मार्गदर्शनात पो. नि. बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा पो.नि. पुसाटे नियंत्रण कक्ष चंद्रपुर यांचे सह स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पोलीस उप निरीक्षक संदिप कापडे पोलीस उप निरीक्षक अतुल कावळे, स.फौ. नितीन जाधय पो. हवा. संजय आतकुलवार, ना.पो.कॉ. सुधीर गते, पो.कॉ. नितीन रायपुरे, गोपाल आतकुलवार, कुंदनसिंग बावरे, प्रांजल झिलपे, रविंद्र पंधरे, म.पो.शि. निराशा तितरे, अपर्णा मानकर यांनाथांनी केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies