Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

आठवडी बाजार येत्या 3- 4 दिवसात सुरु करणारजिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे आ. सुधीर मुनगंटीवार यांना आश्वासन

चंद्रपूर : राज्‍यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढल्‍यानंतर लागु करण्‍यात आलेल्‍या लॉकडाउन पासुन आठवडी बाजार बंद करण्‍यात आले आहेत. टप्‍याटप्‍याने अनलॉक सुरू झाल्‍यानंतर अद्याप आठवडी बाजार मात्र सुरू करण्‍यात आलेले नाही. त्‍यामुळे आठवडी बाजारावर ज्‍यांचा उदरनिर्वाह‍ अवलंबुमन आहे अशा छोटया – मोठया व्‍यावसायीकांचा व्‍यवसाय बंद असल्‍यामुळे त्‍यांच्‍यावर उपासमारीची पाळी आलेली आहे. ही बाब लक्षात घेता त्‍वरीत आठवडी बाजार सुरू करावे अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे केली.

दि. 27 सप्टेंबर रोजी आ.सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्यासह झालेल्या बैठकीत चर्चा केली. या चर्चेदरम्यान आ.मुनगंटीवार म्हणाले टप्‍याटप्‍याने अनलॉक सुरू झाल्‍यानंतर हॉटेल्‍स, मदीरालये आदींना परवानगी देण्‍यात आली आहे. परंतु ग्रामीण तसेच निमशहरी भागातील नागरिकांसाठी अतिशय जिव्‍हाळयाचा समजला जाणारा आठवडी बाजार मात्र अद्याप सुरू झालेला नाही. अद्याप आठवडी बाजार बंद असल्‍यामुळे यावर अवलंबुन असलेल्‍या व्‍यावसायीकांना व्‍यवसायाअभावी आर्थीक विवंचनेचा सामना करावा लागत आहे. त्‍याचप्रमाणे नागरिकांना सुध्‍दा गैरसोय सहन करावी लागत आहे. ही बाब लक्षात घेता आठवडी बाजार सुरू करण्‍याबाबत त्‍वरीत निर्णय घेण्‍याची आवश्‍यकता आ. सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिपादीत केली. येत्या 3 ते 4 दिवसात चंद्रपुर जिल्ह्यात आठवडी बाजार सुरु करण्यात येतील असे आश्वासन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies