Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

इंपोर्टेड गिफ्टच्या नावावर महिलेला ११ लाखांचा गंडाचंद्रपूर : ऑनलाईन लुटपाटच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. राजुरा शहरातही एका महिलेला इंपोर्टेड गिफ्टच्या नावावर तब्बल ११ लाखांनी गंडविल्याची खळबळजनक घटना पुढे आली आहे.आरोपीने व्हॅट्सअॅप कॉल करून ही फसवणूक केली आहे. आपली फसवणूक झाली असे कळताच महिलेने राजुरा पोलीस स्टेशन येथे येऊन तक्रार दिली महिलेच्य तक्रारीवरून राजुरा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध भादंविच्या ४२० कलमानुसार गुन्हा दाखल केला असून.आरोपीचे तार थेट दिल्लीशी जुळलेले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.(11 lakh bribe to a woman in the name of imported gift)आदी आरोपीने महिलेला ऑनलाईन रिक्वेस्ट पाठवून नंतर हळुहळू तिचा वाट्सअॅपवर नंबर घेतला. यानंतर, काही दिवसांनी तिला विदेशातून इंपोर्टेड गिफ्ट पाठवले असल्याचे सांगण्यात आले. मात्र, हे गिफ्ट पैशाच्या कमतरतेमुळे दिल्लीत अडकून पडल्याचे तिला सांगण्यात आले. सोबतच हे गिफ्ट अतिशय मौल्यवान असल्याचेही सांगण्यात आले. ती आता नागपूरला आली आहे, अशी बतावणी करून चक्क ११ लाख रुपयांचा गंडा घातला. यापूर्वी राजुरा शहरातील एका डॉक्टरला एक कोटीचे कर्ज काढून देतो म्हणून २० लाखांनी गंडविले होते. या दोन्ही प्रकरणाचे धागेदोरे दिल्लीपर्यंत पोहचले आहेत.

या प्रकरणी राजुरा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचे तपास अधिकारी एस. वी. दरेकर म्हणाले, या प्रकरणाचे तार दिल्लीशी जुळले आहे. दिल्ली येथील अनेक एटीएममधून पैसे काढुन फसवणूक केली आहे. तो इतका गुन्ह्यात इतका तरबेज आहे की त्याने मोबाईलवरून कुठेही फोन केला नाही. फक्त व्हॅट्सअँपवरून कॉल करत होता. त्यामुळे आवश्यक डाटा उपलब्ध झाला नाही. राजुरा शहरात फसवणुकीचे जाळे पसरले आहेत. राजुरा पोलिस याबाबत कसून चौकशी करीत आहेत.

अशी होऊ शकते ऑनलाईन फसवणूक!

१) Job Offer Scam: या प्रकारात तुम्हाला एक ई-मेल किंवा मेसेज येतो की तुम्ही सध्याच्या काळात घरबसल्या काम करुन पैसे मिळवू शकता. त्यासाठी एक लिंक दिली जाते. ही लिंक Amazon.com सारखी पण फेक लिंक असते. तसेच या लिंक वर क्लिक केल्यास तुमची सर्व बँक खात्याशी संबंधित माहिती अगदी पिन क्रमांकासह विचारली जाते व याचा गैरवापर आर्थिक फसवणूक करण्यासाठी करतात.

२) ऑनलाईन खरेदी स्कॅम : बहुतांश नागरिक ऑनलाईन खरेदीला पसंती देतात. याचा फायदा घेऊन एखादी फेक वस्तू जसे की मोबाईल, पुस्तके, अन्य गृह उपयोगी वस्तू किंवा अगदी पाळीव प्राणी विकायला आहेत अशी जाहिरात करतात. ही लिंक Amazon.com किंवा अन्य e-portal सारखी दिसायला पण फेक लिंक असते. तसेच या लिंकवर क्लिक केल्यास तुमची सर्व बँक खात्याशी संबंधित माहिती अगदी पिन क्रमांकासह विचारली जाते याचा गैरवापर आर्थिक फसवणूक करण्यासाठी करतात.


३) Boss Scam: कधी- कधी तुम्हाला तुमच्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी यांच्या नावाने एखादा ई-मेल किंवा मेसेज येतो कि तुमच्या वरिष्ठांनी तुमच्यासाठी Amazon gift card खरेदी केले आहे, तर सोबतच्या लिंकवर क्लिक करुन ते redeem करा. सदर लिंक Amazon.com सारखी पण फेक लिंक असते.तसेच या लिंक वर क्लिक केल्यास तुमची सर्व बँक खात्याशी संबंधित माहिती अगदी पिन क्रमांकासह विचारली जाते याचा गैरवापर आर्थिक फसवणूक करण्यासाठी करतात.


४) टॅक्स स्कॅम : यामध्ये नागरिकांना एक ई-मेल किंवा मेसेज येतो कि तुम्ही काही कर (Tax) भरायचा बाकी आहे व तो तुम्ही सोबतच्या लिंकवर क्लिक करुन एका विशिष्ट तारखेपर्यंत भरा अन्यथा तुमच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.सदर लिंक ही सरकारी कर भरायच्या लिंक सारखीच दिसते, पण फेक लिंक असते. तसेच या लिंकवर क्लिक केल्यास तुमची सर्व बँक खात्याशी संबंधित माहिती अगदी पिन क्रमांकासह विचारली जाते त्याचा गैरवापर आर्थिक फसवणूक करण्यासाठी करतात.

अशी घ्यावी खबरदारी

१) जर वरील नमूद प्रकारचे काही ई-मेल किंवा मेसेज किंवा फोन आले तर त्यावर लगेच विश्वास ठेऊ नका.

२) सध्याच्या काळात जर कोणी तुम्हाला घर बसल्या पैसे मिळवू शकता असे सांगत असतील तर लगेच विश्वास ठेऊ नका तुम्ही फसविले जाण्याची शक्यता अधिक आहे.

३) ऑनलाईन खरेदी करताना सावधानता बाळगा. एखादी वस्तू जर कोणी बाजारभावापेक्षा खूप स्वस्त विकत असेल, तर सतर्क व्हा.

४) इंटरनेटवर उपलब्ध असलेली सर्व काही माहिती खरीच असेल असे नाही.

५) जर तुम्हाला तुमच्या वरिष्ठांनी gift card coupon भेट दिली आहे, असा काही ई-मेल किंवा मेसेज आला तर त्याची वरिष्ठांकडून खात्री करून घ्यावी.

जर तुमची वरील नमूद प्रकाराने किंवा अन्य कोणत्याही प्रकारची ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाली असेल तर त्याची तक्रार जवळच्या पोलीस ठाण्यात नोंदवा, तसेच www.cybercrime.gov.in या वेबसाईटवर पण माहिती द्यावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies