चंद्रपूरातूनच कटकारस्थान झाल्याची चर्चा !
कोणता मोठा नेता यात आहे सक्रिय, याचा पर्दाफाश व्हायलाच हवा !
चंद्रपूर : नुकतेच चार दिवसांपूर्वी ऑनलाइन क्रिकेट सट्टा प्रकरणात चंद्रपुरातील काही आरोपींना गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी अटक केली. या आरोपींचा चार दिवसाच्या पीसीआर घेण्यात आला. पोलिस कस्टडी रिमांड मध्ये या आरोपींनी गडचिरोली पोलिसांसमोर संपूर्ण सत्य उगलले व चंद्रपुरातील विविध राजकीय पक्षांशी संबंधित असलेल्या काही युवा नेत्यांच्या सरळ संपर्क असल्याचे विविध माध्यमातून प्रकाशित झाले होते, त्यावरूनच ही 🔥 आगडोंब माजली. यासंदर्भात चंद्रपुरात एका मोठ्या राजकीय नेत्याचा वरदहस्त प्राप्त असलेला रेती तस्कर पोलिसांची मध्यस्थी करत असल्याचे वृत्त आहे. चंद्रपुरात यासंदर्भात नुकतीच एक मीटिंग झाल्याची विश्वसनीय माहिती आहे. पूर्वी चंद्रपुरातील एका नगरसेवकाची चार चाकी वाहन जाळण्यात आले होते असे सांगण्यात येत आहे.
क्रिकेट सट्टा प्रकरणात मुख्य भूमिका बजावणारे ते दोन युवा नेता आता निर्धास्त असल्याचे सांगण्यात येत आहे मग खिचडी कुठे शिजली? याचा तपास वरिष्ठ स्तरावर व्हायला हवा. मिळालेल्या माहितीनुसार हे संपूर्ण प्रकरण करोडो रुपयांचे असून या प्रकरणातून या युवा नेत्यांना अटकेपासून बाहेर ठेवण्यासाठी त्यांचे नाव न येण्यासाठी आज चंद्रपुरात झालेली मीटिंग व गडचिरोलीच्या पोलिसांच्या आत्तापर्यंतच्या प्रामाणिक कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उभी करणारी आहे. या प्रकरणाचे वृत्त प्रकाशित होऊ नये यासाठी ही मीटिंग घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गडचिरोली पोलिसांनी या संदर्भात अवश्य खुलासा करावा. ऑनलाइन क्रिकेट सट्याचे मोठ्या रॅकेट चा पर्दाफाश करण्याचे श्रेय पोलिसांनी गमावले आहे.गडचिरोली पोलिसांनी ऑनलाइन क्रिकेट सट्ट्याच्या हा कारोबार पूर्णपणे बंद करून आत्तापर्यंत केलेल्या कारवाईला मुर्त रूप दिल्यास महाराष्ट्र मध्ये त्यांचे नाव अवश्य मोठे होऊ शकते. सोशल माध्यमांवर विविध प्रकाराने "त्या" युवा नेत्यांवर ताशेरे ओढले जात आहे हे ताशेरे सरळ सत्ताधारी पक्षांकडे जात आहे. पोलिसांनी याचाही तपास करायला हवा.