Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

गटनेते पप्पू देशमुख यांना प्रवेशद्वारावर रोखण्याचा प्रश्नच येत नाहीभ्रष्टाचारच घडला नाही तर पुरावे कुठले देणार : महापौर

शहर विकास आघाडीचे गटनेते पप्पू देशमुख यांची महापौर व आयुक्त यांचे विरुद्ध शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार

चंद्रपूर : आज दिनांक 31.8.2021 रोजी दुपारी 1 वाजता चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या राणी हिराई सभागृहामध्ये मासिक सर्वसाधारण आमसभेचे आयोजन करण्यात आले होते. कोरोना आपत्तीमुळे सर्वसाधारण सभा ऑनलाइन घेण्यात येते. महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सर्व पक्षाचे गटनेते तसेच विरोधी पक्षनेते व सभागृह नेते यांना या आमसभेत प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची मुभा आहे. अशाप्रकारची मुभा देणारे लेखी पत्र आमसभेच्या अजेंडा सोबत सर्व पदाधिकारी व गट नेत्यांना देण्यात आले. त्यानुसार सर्व निमंत्रित आमसभेत उपस्थित राहिले. त्यामुळे एकट्या गटनेते पप्पू देशमुख यांना प्रवेशद्वारावर रोखण्याचा प्रश्नच येत नाही.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. पोलीस व मनपाच्या कर्मचाऱ्यांनी निमंत्रित सदस्यांना आतमध्ये जाण्यापासून रोखले नाही. गटनेते पप्पू देशमुख यांनी जमाव केल्याने सुरक्षा रक्षकानी थांबविले. केवळ त्यांना एकट्याला जाता येईल, असे सांगितले. मात्र, देशमुख आणि इतर आभासी निमंत्रित सदस्य आत येण्यास अडून राहिल्याने सुरक्षा रक्षकांनी प्रवेशद्वार उघडले नाही. तरीही केवळ आकसापोटी आणि बदनामी करण्यासाठी देशमुख यांनी महापौर राखी कंचर्लावार तसेच आयुक्त राजेश मोहिते यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दिली. आजच्या आमसभेत करोडो रुपयांच्या एका भ्रष्टाचाराचा मुद्दा पुराव्यानिशी उघडकीस आणणार होतो, असे प्रसिद्धीमाध्यमाना सांगून निरर्थक आरोप देशमुख करीत आहेत. भ्रष्टाचारच घडला नाही तर पुरावे कुठले देणार, असे प्रतिउत्तर महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिले आहे.
आमसभेत जाण्यापासून रोखण्याचा कट रचला...

शहर विकास आघाडीचे गटनेते पप्पू देशमुख यांची महापौर व आयुक्त यांचे विरुद्ध शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार                                                                                                                                                       आज दिनांक 31.8.2021 रोजी दुपारी 1 वाजता चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या राणी हिराई सभागृहामध्ये मासिक सर्वसाधारण सभेचे (आमसभेचे) आयोजन करण्यात आले होते.कोरोना आपत्तीमुळे सर्वसाधारण सभा ऑनलाइन घेण्यात येते.मात्र महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सर्व पक्षाचे गटनेते तसेच विरोधी पक्षनेते व सभागृह नेते यांना या आमसभेत प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची मुभा आहे.अशाप्रकारची मुभा देणारे लेखी पत्र आमसभेच्या अजेंडा सोबत सर्व पदाधिकारी व गट नेत्यांना देण्यात येते.मात्र आजच्या आमसभेत उपस्थित राहण्यासाठी दुपारी 12.50 वाजता चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर आलेलो असताना प्रवेशद्वाराला आत मधून कुलूप लावलेले होते.तसेच तिथे उपस्थित पोलीस व मनपाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्याला आत मध्ये जाण्यापासून रोखले.महापौर राखी कंचर्लावार तसेच आयुक्त राजेश मोहिते यांनी आपणांस आत मध्ये घेण्यात येऊ नये अशा प्रकारचे आदेश दिल्याचे तिथे उपस्थित कर्मचाऱ्यांनी देशमुख यांना सांगितले.तसेच कुलूप उघडण्याची वारंवार विनंती करूनही कर्मचाऱ्यांनी दरवाजाचे कुलूप उघडले नाही.असा शहर विकास आघाडीचे गटनेते पप्पू देशमुख यांचा आरोप आहे. यानंतर देशमुख यांनी शहर पोलीस स्टेशन मध्ये दुपारी 1.30 च्या सुमारास महापौर राखी कंचर्लावार व आयुक्त राजेश मोहिते यांच्याविरुद्ध फौजदारी तक्रार केली. आपण आजपर्यंत अनेक भ्रष्टाचाराचे मुद्दे पुराव्यानिशी उघड केले.आजच्या आमसभेत करोडो रुपयांच्या एका भ्रष्टाचाराचा मुद्दा पुराव्यानिशी उघडकीस आणणार होतो. ही बाब काही अधिकाऱ्यांच्या मार्फत महापौर व आयुक्त यांना माहितीस आली व त्यामुळे त्यांनी कटकारस्थान रचून आपल्याला आमसभेत येण्यापासून म रोखले असा आरोप नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केलेला आहे.तशा प्रकारची तक्रार करून फौजदारी कारवाई करण्याची मागणी त्यांनी शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अंभोरे यांच्याकडे केलेली आहे.या तक्रारीची दखल घेऊन उचित कारवाई न झाल्यास मनपातील भ्रष्टाचार व दडपशाहीविरुद्ध जनआंदोलन पुकारण्याचा इशारा सुद्धा देशमुख यांनी दिला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies