Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

उपसरपंच ला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल !निवडणुकीचा पूर्वग्रह मनात ठेवून असलेल्या इसमाने राजकीय सूड भावनेतून वाद निर्माण करून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या ताडाळी गावातील नंदकिशोर बाबा जुनघरे या इसमावर पडोली पोलीस स्टेशन येथे सिव्हील अॅक्ट धारा ५०४ आणि ५०६ अननवये सायंकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदर घटना सकाळी 11 वाजता ताडाळी ग्रामपंचायत येथील उपसरपंच गावातील सांडपाणी व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापन नियोजन नकाशा गावात तयार करत असताना घडली.नंदकिशोर जुनघरे हा व्यक्ती अचानक येऊन मंदिरात लाईट नाही लावला किती वेळा चपराशिला सांगितलं अस म्हणून उपसरपंच निकीलेश चामरे ला अश्लील भाषेत शिवीगाळ करू लागला.उपसरपंच यांनी म्हटले की तुम्ही चपराशिला सांगितले आणि त्यांनी लाईट लावला की नाही हे मला कसं माहीत पडेल नियमानुसार मी तुमच्या वार्ड चा सदस्य आहो तुम्ही मला सांगायला पाहिजे होते मी चपराशीला सांगितले असते.तुमचे काम झाले असते.पण नंदकिशोर काही न एकता बोलताना मुद्दा भटकावून अश्लील भाषेत बोलत होता.पुन्हा अश्र्लील शिवीगाळ करून मोठा आला उपसरपंच,मोठा शिकला बांडा मले सांगत हाय का बे तु ! अशा प्रकारे पदाचा अपमान करीत पायातला बूट काढून उपसरपंच च्या अंगावर मारायला आला.पण गावातील व्यक्ती आडवा आल्याने उपसरपंच निकीलेश चामरे यांचा जीव थोडक्यात बचावला. जेव्हा निकीलेश पुन्हा नकाशा काढण्याच्या कामात लागले तर तो पुन्हा अंगावर धावून येत म्हणाला की तुया हद्द्या गायब करीन कोणाले माहीत पण पडणार नाही अश्या शब्दात जीवे मारण्याची धमकी दिली.पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करू शकतो असे उपसरपंच म्हणाल्यास नंदकिशोर म्हणाला की जे कराच हाय थे कर,मी कोणालेस भेत नाही माझ्या वर मोठा हात हाय ! आता हा मोठा हात कोण हा प्रश्न पडला आहे.कुणाच्या बळावर लोकांना अशी गुंड प्रवृत्तिगिरी करण्याची हिम्मत येते.गावातील शासकीय काम करत असताना अडथळा आणून उपसरपंच निकीलेश चामरे ला जिवे मारण्याची धमकी दील्यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आले आहे आणि नंदकिशोर जुनघरे वर टीका केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies