भद्रावती प्रतिनिधी :- भद्रावती शहरामधील विविध समस्यांसाठी मुख्यकार्यकारी अधिकारी सुर्यकांत पिदुरकर साहेब आणि नगराध्यक्ष अनिल भाऊ धानोरकर यांना निवेदन देण्यात आले. शहरातील चंद्रपुर नागपुर हायवे वरिल सर्विस रोडला लागुन असलेले दोन्ही बाजुचे अतिक्रमणा विषयी उपाय योजना करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. १५ दिवसापासुन बस स्थानकापासुन तर सुमठाणा पर्यंत असलेले स्ट्रीट लाइट बंद आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेस ये जा करतांना लोकांना अंधारातुन जावे लागत आहे. जंगली प्राणी नेहमी या भागामध्ये आढळत असल्याकारणाने स्ट्रीट लाइट लवकरात लवकर सुरू करावे. जेणे करून नागरिकांच्या जिवाला धोका होणार नाही.
गौतम नगर येथील वारंवार निर्माण होणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा. गौतम नगर येथे ब-याच दिवसापासुन नळाव्दारे गढुळ पाणी मिळत आहे. यासंदर्भात नगर परिषद कर्मचारी यांना वारंवार फोन व्दारे सांगुण देखील त्यावर उपाय योजना करण्यात आली नाही. त्यामुळे मुख्याधिकारी पिदुरकर साहेब यांना कल्पना देण्यात आली. तेव्हा पिदुरकर साहेब यांनी स्वत: येऊन पहाणी करण्याचे आस्वासन दिले. गौतम नगर येथील नागरिकांचे स्वास्थ्य धोक्यात येणार नाही यासाठी लवकरात लवकर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी काढावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.
अश्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली. सुर्यकांत पिदुरकर साहेब यांनी त्वरित कार्यवाही करत सर्व संबंधित पदाधिकारी यांना विचारणा करून त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश दिले. निवेदन देतांना वसंत वर्हाटे, वामन नामपल्लीवार, गुलाब लोणारे, अशोक शेंडे आणि प्रविण चिमुरकर यांची उपस्थिती होती.
पिदुरकर साहेब यांनी आस्वासन दिल्याप्रमाणे सायंकाळी गौतम नगर येथे येऊन संपुर्ण गौतम नगर पायदळ फिरून येथील नळांची पहाणी केली. नळाचे पाणी गढुळ आणि पाण्याची दुर्गंध येत असुन पाण्यामध्ये फेस येत असल्याचे पहाणीत लक्षात आले. पिदुरकर साहेब यांनी नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागातील संबंधित पदाधिकारी, नगर सेवक यांना त्वरित नळ पाईप लाईन दुरुस्ती करण्याचे आदेश दिले.