■ स्थायी समिती सभापतीच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी
🎯 सोमवारी 'स्टॅन्डिंग'ची सभा
चंद्रपूर :- महानगरपालिकेतील स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांचा कार्यकाळ १ एप्रिल रोजीच संपुष्टात आला असला तरी लॉकडाउनमुळे त्यांना काही दिवसांची मुभा मिळाली. मात्र, सत्तारूढ भाजपा-मित्र पक्षाकडूनच स्थायी समिती सभापती निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली आहे. २३ ऑगस्ट रोजी स्थायी समितीची सभा आयोजित करण्यात आली असून, या सभेत निवृत्त होणाऱ्या स्थायी समिती सदस्यांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली जाणार आहे. #Standing Committee Chairman
स्थायी समितीमध्ये एकूण १६ सदस्य असून यामध्ये भाजपा १० काँग्रेस ३, बहुजन समाज पक्ष २ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा १ सदस्य आहे. यातील ८ सदस्यांचा कार्यकाळ १ एप्रिल रोजीच संपला, पण कोरोनातील टाळेबंदीमुळे या सदस्यांचा कार्यकाळसुद्धा वाढला. कार्यकाळ संपलेले ८ सदस्यांना निवृत्त करण्याचा ठराव २३ ऑगस्ट रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत ठेवण्यात आला आहे. या ८ सदस्यांमध्ये भाजपाचे विद्यमान स्थायी समिती सभापती रवी आसवानी, संजय कंचर्लावार, सुभाष कासनगोवार हे तिघे काँग्रेसचे २, बहुजन समाज पक्षाचे २ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका सदस्याचा समावेश आहे. त्यामुळे पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सभापतीपदाची निवडणूक होण्याची चिन्हे दिसू लागली आहे.