Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

भद्रावती शहरातील प्रत्येक वार्डात धूरांडा व औषध फवारणी करा - शिवसेना शहर प्रमुख नंदू पडाल





भद्रावती :- कोरोनानंतर जिल्ह्यासह भद्रावती शहरावर डेंग्यूचे संकट कोसळले आहे. शहरात डेंग्यूच्या रोगाचे थैमान सुरू असून डेंगू मुळे अनेक लोक आजारी झाले आहे भद्रावती शहरातील काही लोकांना डेंगू मुळे जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे भद्रावती शहरातील संपूर्ण वार्डात नगरपरिषदे द्वारे धूरांड फवारणी व औषध फवारणी करण्यात यावी जेणेकरून भद्रावती शहरातील लोकांना डेंगू चे आजारापासून संरक्षण होईल. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून भद्रावती नगरपरिषद चे हे कर्तव्यच आहे. यासाठी आज शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक नंदू पडाल यांनी भद्रावती नगर परिषदेचे मुख्यअधिकारी यांना निवेदन दिले. या निवेदनात युद्धपातळीवर संपूर्ण भद्रावती शहरातील प्रत्येक वार्डात धुरांडा व औषध फवारणी करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी शिवसेना तालुका संघटक नरेश काळे, नगरसेवक राजूभाऊ सारंगधर, उपतालुकाप्रमुख बाळा क्षिरसागर ,युवा सेना तालुका समन्वयक घनश्याम आस्वले, युवा सेना शहर समन्वयक गौरव नागपुरे, आशिष ठेंगणे, राहुल खोडे,येशू आर्गी, सतीश आत्राम, मयुर शेडामे इत्यादी शिवसैनिक उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies