प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी त्या राजकीय पदाधिकाऱ्यांची चंद्रपुरात सुरू आहे सेटिंग!
नुकतीच गडचिरोली पोलिसांनी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनात चंद्रपूरमध्ये ऑनलाइन क्रिकेट सट्टा खेळणाऱ्या बुकींना गजाआड केले. या बुकिंचया थेट संपर्क गडचिरोली जिल्ह्यातील काही दलालांशी होता. त्यांच्या बयाना वरून गडचिरोली पोलिसांनी चंद्रपूरात ही मोठी कारवाई केली. चार दिवसापूर्वी झालेल्या या कारवाई पोलिसांनी आरोपींच्या पीसीआर घेतला होता या पिशव्यांमध्ये पोलिसांसमोर काही नावे समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. नुकताच इ आरोपींच्या पीसीआर संपला असून या धंद्यामध्ये सक्रिय असलेले काही राजकीय पक्षाचे युवा नेते हे चंद्रपूरशी संलग्नित असल्यामुळे त्या युवा नेत्यांना अटक करण्याची कारवाई गडचिरोली पोलिस करीत असून स्वतःवर ची कारवाई वाचविण्यासाठी हे युवा नेते एका रेती तस्करांच्या घरी बसून गडचिरोली पोलिसांशी जुळवाजुळव करण्याच्या प्रयत्नात असल्याचे विश्वसनीय सूत्र आहे.