Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉल्सकरीता नियमावली जारीचंद्रपूर दि.17 ऑगस्ट : जिल्ह्यातील शॉपिंग मॉल्स संदर्भात काही सूचना अंतर्भूत केलेल्या सुधारणा चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दि. 16 ऑगस्ट 2021 पासून लागू करण्यात येत आहे. तरी सर्व संबंधित प्रशासकीय विभाग प्रमुखांनी सदर आदेशात नमूद केलेल्या सुधारणांचे काटेकोरपणे पालन होण्याच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शॉपिंग मॉल्स सर्व दिवस रात्री 10 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात येत आहे. तथापि, शॉपिंग मॉल्समध्ये काम करणाऱ्या सर्व व्यवस्थापन व कर्मचारी आणि प्रवेश करणाऱ्या सर्व नागरिकांचे कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण व दुसरी मात्रा झाल्यानंतर 14 दिवसाचा कालावधी पूर्ण होणे आवश्यक राहील. तसे लसीकरण प्रमाणपत्र व त्यासमवेत फोटोसहित ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहील.

18 वर्षाखालील वयोगटातील मुलांचे लसीकरण अद्याप सुरू न झाल्याने 18 वर्षाखालील वयोगटातील मुलामुलींना मॉलमध्ये प्रवेश करतांना वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड, आयकर विभागाने निर्गमित केलेले पॅन कार्ड किंवा वयाचा उल्लेख असलेले शाळा किंवा महाविद्यालयाचे वैध ओळखपत्र प्रवेशद्वारावर दाखविणे आवश्यक राहील.

सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्याने संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 तसेच साथरोग कायदा 1897 अन्वये दंडनीय व कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. सदर आदेश संपूर्ण जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात दि. 16 ऑगस्ट 2021 असून पुढील आदेशापर्यंत लागू राहील, असे जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आदेशात नमुद केले आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies