निलंबित असूनही निभावीत आहे पोलीस वाहन चालकाचे। कर्तव्य
चंद्रपूर : नुकतीच १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पाथरी येथील पोलिस कर्मचारी उमेश पोटावी याना रंगेहात अटक केल्यामुळे पोलीस विभागाने त्याला निलंबित केले, उमेश पोटावि यांनी काही दिवस कारागृहाच्या हवा खाल्यानंतर त्यांना जामीन मिळाला. जामीन मिडताच कर्मचाऱ्याने सहायक पोलीस निरीक्षक यांच्या वाहनावर वाहन चालक म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक साहेबांच्या आशीर्वादाने अवैध वसुली सुरू केल्याने सर्वत्र खडबड उडाली आहे. निलंबित कर्मचाराला कोणत्या निकषावर वाहन चालक म्हणून रुजू केले याचा शोध घेण्याची जबाबदारी आता थेट पोलिस अधिक्षक साळवे यांच्या वर आली आहे.
पाथरी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या एका आरोपीला गुन्हयातून सोडण्यासाठी १५ हजार रुपयांची मागणी केली होती, मात्र फिर्यादिनी आपण गुणांचं केला नाही तर पैसे कशाला देऊ असे मनत सदर प्रकरणाची तक्रार लाच प्रतिबंधक विभागाकडे केली . त्यावरून 14 जुलै रोजी 15 हजाराची लाच घेताना पोलीस स्टेशनचा मागील बाजूस अटक करण्यात आली होती. त्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ट करून न्यायालयात गेले असता त्याला कोर्टाने उमेश पोटावी यांची कारागृहात रवानगी केली होती. कारागृहातून सुटका होताच ठाणेदार यांच्या आशीर्वादाने सुरू असलेली वसुली करण्याकरिता पुन्हा निलंबित कर्मचारी पोटावी याना संधी देत त्यांना ठाणेदार यांचे वाहन चालक व वसुली नायक म्हणून यशस्वी कामगिरी देण्यात आली. पोटावी यांच्याकडे निलंबित होण्या पूर्वीही वसुलीची जबाबदारी होती, त्यांच्यावर ठाणेदारचे वसुली आशीर्वाद आहे. पोटावी यांच्या वसुली मोहीम मुळे अनेक नागरिक त्रस्त असून निलंबीत कर्मचारी याना स्वतःच्या वाहनावर वाहन चालविण्याची जबाबदारी देणाऱ्या ठाणेदार बनसोड यांच्यावरही कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.