युवानेते आकाश मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त भाजयुमो महानगर जिल्हा, चंद्रपूर व मराठी बाणा बहुउद्देशीय संस्थातर्फे यशस्वी उपक्रम
चंद्रपूर :
भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आकाश मस्के यांच्या वाढदिवसानिमित्त भाजयुमो महानगर जिल्हा,चंद्रपूर तर्फे स्थानिक इंदिरा नगर येथील पंडित जवाहरलाल नेहरू शाळेजवळ प्रधानमंत्री उज्वला योजने अंतर्गत भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सदर योजनेमध्ये 245 नागरिकांनी सहभाग नोंदविला असून,यापैकी 37 नागरीक लाभार्थी पात्र ठरले.या मेळाव्याचे उद्घाटन भाजपा महानगर जिल्हा महामंत्री इंजि.सुभाष कासनगोट्टूवार यांनी केले.
यावेळी भाजपा अल्पसंख्यांक मोर्चा महानगर जिल्हाध्यक्ष अमीनभाई शेख,नाळे सर,भाजपा महानगर जिल्हा सचिव चंदन पाल,
भाजयुमो महानगर जिल्हा उपाध्यक्ष यश बांगडे,जिल्हा सचिव रामजी हरणे,
जिल्हा सचिव आशिष ताजने,जिल्हा सचिव प्रविण उरकुडे,जिल्हा कार्यकारीणी सदस्य महेश कोलावार, युवा मोर्चा मंडळ संजय पटले, विक्की मेश्राम आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज दुरटकर,गणेश कुडे,महेश दडमल,प्रवीण वनकर,श्रीकांत उईके,मनोज बुरडकर,विनोद गुरनुले,राहुल फरताडे,सुमित मलेकर,प्रितम कारेकर,सौरव वडस्कर,पवन गोखरे यांनी अथक परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे संचालन आकाश मस्के तर आभार श्रीकांत उईक यांनी मानले.