चोराला पकडण्यात पोलिसांना यश
वडिलांचा गंभीर आजारवर उपचारासाठी पैसे नसल्याने चोरी केल्याची आरोपीची कबुली
आक्सापूर : महाराष्ट्र-तेलंगणातील भाविकांचे आराध्य देवस्थान असलेल्या कोंडय्या महाराज मंदिरात चोरीचे सत्र सुरू होते. देवस्थानातील दानपेटी फोडून तेथील रोख रक्कम लंपास केली जायची. अश्यात शनिवारी पहाटेला चोराने सीसीटीव्हीला पेंट फासून दानपेटी फोडली अन रक्कम लंपास केली. मात्र काही तासातच धाबा पोलिसांना चोराला पकडण्यात यश आले.(#Kondya Maharaj broke the donation box in the temple)
महाराष्ट्र-तेलंगणातील भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री संत परमहंस कोंडय्या महाराज यांचे देवस्थान धाबा येथे आहे. मागील वर्षभरात या देवस्थानातील दानपेटी चार वेळा फोडण्यात आली. अश्यात शनिवारी पहाटे सात वाजता मंदिराचे पुजारी शेगमवार महाराज महासमाधीची पूजा करण्यासाठी गेले असता त्यांना मंदिरात असलेल्या सीसीटीव्हीवर पेंट फासलेला दिसला. दानपेटी फोडलेल्या अवस्थेत आढळून आली. शेगमवार यांनी देवस्थान संस्थेचे अध्यक्ष अमर बोडलावार, सचिव किशोर अगस्ती यांना घटनेची माहिती दिली. संस्थानचा पदाधिकाऱ्यांनी धाबा उपपोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. हा प्रकार पाचव्यांदा घडला असल्याने धाबा पोलिसांनी चौकशीचे सूत्र जलद गतीने हलविले. अवघ्या तासाभरात आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी धाबा गावातीलच असून सूरज दुर्गे असे आरोपीचे नाव आहे. तो धाबा येथील आपल्या आजीकडे राहत आहे. दानपेटीतील दोन हजाराची रक्कम आरोपीने लंपास केली. माझे वडिलांना गंभीर आजार झाला आहे. उपचारासाठी पैसे नसल्याने चोरी केल्याचे आरोपीने बयानात सांगितले आहे. पुढील तपास धाबा ठाणेदार सुशील धोपटे करीत आहेत.