राजस्थानातून मुलीची सुखरूप सुटका व तीन आरोपींना अटक
वरोरा :- चंद्रपूर जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी मध्ये वाढ होताना दिसून येत आहे त्यातच अल्पवयीन मुलींना पळविण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. आज वरोरा तालुक्यातील पिंपळगाव (शिंगरू) या गावातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून राजस्थान राज्यातील शाडोल (ता. विटवा, जि. कोठा) या गावी नेले व विवाह लावून दिल्याची तक्रार मुलीच्या पित्याने वरोरा पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. तक्रारीवरून वरोरा पोलिसांच्या एक पथकाने थेट राजस्थान गाठले व तिघांना अटक केली मुलीलाही गावात सुखरूप आणले. रामस्वरूप केसरीलाल बरवा (वय ३२), छोटूलाल माधवलाल बरवा, आणि तस्वीर छोटूलाल बरवा, अशी अटकेतील आरोपींची नावे आहे He kidnapped a minor girl by showing the lure of marriage
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पिंपळगाव (शिंगरू) येथील एका अल्पवयीन मुलीला रामस्वरूप केसरीलाल बरवा याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. काही दिवस त्यांचे प्रेमप्रकरण सुरू होते. त्याने अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखविले. मुलगी त्याच्या आमिषाला बळी पडली. रामस्वरूप बरवा याने अल्पवयीन मुलीस राजस्थान राज्यातील शाडोल (ता. विटवा, जि. कोठा) या गावी नेले. काही दिवस घालविल्यानंतर त्या मुलीसोबत विवाह करण्यात आला. #Chandrapur_crime news
इकडे पिंपळगावात अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याने वडिलाने सर्वत्र शोध घेणे सुरू केले. मात्र मुलीचा काहीच पत्ता लागला नाही. तिच्या मैत्रिणीची विचारपूस केली असता त्यांचे प्रेमप्रकरण समोर आले. अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविल्याची तक्रार पित्याने वरोरा पोलिस ठाण्यात केली होती. तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी रामस्वरूप बरवा राहत असलेले राजस्थानीतील कोठा गाव गाठले. तेथून रामस्वरूप केसरीलाल बरवा, छोटूलाल माधवलाल बरवा, तस्वीर छोटूलाल बरवा या तिघांना अटक करून गुन्हा दाखल केला. अल्पवयीन मुलीला वडिलांच्या ताब्यात देण्यात आले. अधिक तपास वरोरा पोलिस करीत आहे.