चंद्रपूर जिल्ह्यात मागील गेल्या काही महिन्यापासून गुंडगिरीने आपले डोके वर काढले आहे. पोलिसांचा धाक आता गुंड मध्ये राहालेला नाही. अशातच बल्लारपूर शहरामध्ये मागील जूलै महिण्याच्या २३ तारखेला बल्लारपूरातील महाराणा प्रताप वार्ड येथे सायंकाळी ९:३० वाजताचे दरम्यान गँगवार मध्ये संदीप उर्फ बोग्गा सुरेश दवंडेवार याला चार आरोपींनी तलवार व दगड (गहू) ने जबर मारहाण करून गंभीर जखमी केले होते. या घटनेची माहिती मिळताच बल्लारपूरचे ठाणेदार उमेश पाटील आपल्या पोलिस सहका-यां सोबत घटनास्थळी हजर झाले होते. मारहाणीत जखमी संदीप उर्फ बोग्गा ला दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. तसेच या घटनेशी संबंधित चारही आरोपींना अटक केली. त्या ठिकाणाहून गंभीर जखमी बोग्गाला चंद्रपूर येथील डॉ. पोत्तदार यांच्याकडे पाठविण्यात आले. जखमी बोग्गाची उपचारादरम्यान काही सुधारणा होत नसल्याने त्याला नागपुर येथील दवाखान्यात उपचार सुरु होते. तो पंधरा दिवसांपासून जीवन मृत्यूशी संघर्ष करत असतांना अखेर आज दि. ७ ऑगस्ट रोजी दुपारच्या वेळी संदिप उर्फ बोग्गा यांनी अखेरचा श्वास घेतला. ही बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरताच नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बल्लारपूर शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी व ग्यांगवार चे प्रमाण वाढत असून पोलिस आपल्या कर्तव्यात निष्क्रिय ठरत असल्याची नागरिकात चर्चा सुरू आहे.
तलवार व दगडने जबर मारहाणीत जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू
ऑगस्ट ०७, २०२१
0
Tags