Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

वाघाची शिकार करुन अवयव विक्री प्रकरणी चौघांना अटक Four arrested in tiger hunting case
प्रतिनिधी चंद्रपूर, 31 ऑगस्ट : चंद्रपूर जिल्ह्यातील गोडपिपरी तालुक्यातील कोठारी वनक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या पाचगाव नियत क्षेत्रात वाघाची शिकार करून अवयव विक्री करणाऱ्याला अटक (Tiger organs smuggling Chandrapur district) करण्यात आली आहे.नागपूर मार्गावरील बुटीबोरी येथे मुद्देमालासह आरोपीला अटक करण्यात आली.(MH-34UPDATENEWS)

चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील पाचगाव हे वनक्षेत्र वनहक्क दाव्या अंतर्गत वनसंवर्धन करण्यासाठी अनुसुचित जमाती प्रवर्गाला इतर पारंपरिक वननिवासी म्हणून वनसमितीला हस्तांतरण करण्यात आले. मात्र येथील वनसमितीचे लाभार्थी वन्य प्राण्यांची शिकार करून त्यांच्या अवयवाची विक्री करीत असल्याची बाब उघड झाली आहे. पाचगाव येथील महादेव आळकू टेकाम हा वाघाचे अवयव विक्रीसाठी जात असताना बुटीबोरी वनक्षेत्राचे वनक्षेत्राधिकारी एल. व्ही.

ठोकड यांच्या पथकाने ताब्यात घेतले. ही घटना रविवारी रात्री निदर्शनास आल्याने मुद्दे मालासह आरोपी ताब्यात घेऊन कारवाई करण्यात आली. चौकशीत चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील पाचगाव आणि कोठारी वनक्षेत्रातील नियत क्षेत्र असल्याने तपास चक्रे या दिशेने गतीमान झाली.

ठोकड यांच्या समवेत कोठारी चे वनक्षेत्र अधिकारी संदीप लंगडे , राजुरा फिरते पथकाचे अधिकारी विनायक नरखेडकर, व बल्लारपूर फिरते पथकाचे अधिकारी गादेवार आणि वनकर्मचारी टीमसह आरोपींच्या गावी झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे शिकारीचे अवजारे आढळून आले. त्याचसोबत मुख्य आरोपी महादेव आळकू टेकाम, विजय लक्ष्मण आलाम, रामचंद्र नागो आलाम यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींना पुढील तपासासाठी बुटीबोरी वनक्षेत्राकडे रवाना करण्यात आले आहे. त्यातील चौथा आरोपी लकव्याने पीडित असल्यामुळे त्यास मुभा दिल्याची माहीती सूत्रांनी दिली आहे. पुढील तपास बुटीबोरी वनक्षेत्राचे वनक्षेत्राधिकारी करीत असून ज्या भागातून आरोपी ताब्यात घेण्यात आले ते क्षेत्र अनुसुचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी म्हणून वनसमितीला हस्तांतरण करण्यात आलेले राखीव वनक्षेत्रात घडली असल्याने या तस्करी मागे करता करविता कोणी असल्याचा संशय व्यक्त केल्या जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies