चंद्रपूर :- काल दिनांक ६/८/२१ रोजी चंद्रपूर मधील शिवसैनिक बंडू हजारे यांनी मुंबई येथे भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस श्री सचिनजी अहिर यांची सदिच्छा भेट घेतली व पुष्पगुच्छ देताना फोटो काढला व त्या फोटोचा वापर करत सोशल मीडियावर आपली भारतीय कामगार सेनेच्या चंद्रपूर जिल्हा संघटक पदी नेमणूक झाल्याच जाहीर केलं
शिवसेना चंद्रपूर संपर्क प्रमुख प्रशांत कदम यांनी अश्या प्रकारची कोणतीही नेमणूक झाली नसून कुणालाही जिल्हा संघटक पदाव नियुक्ती पत्र देण्यात आलेले नाही तरी सोशल मीडियावर जे कोणीही अश्या अफवा पसरवत असतील तर पक्ष शिस्त भंग समजून कारवाई करण्यात येईल असे एका परिपत्रकातून जाहीर केले
माननीय पक्ष प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्भवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व भारतीय कामगार सेने अध्यक्ष तथा खासदार श्री अरविंद सावंत साहेब व सरचिटणीस श्री सचिनजी अहिर आणि विटणीस दिलीप जी पानिकर यांच्या सहमतीने नवीन नियुक्ती लवकरच जाहिर करण्यात येईल