Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांची वनविभागात धडक

वन्यप्राण्यांपासून शेतपिकांच्या संरक्षणाकरिता सोलर बॅटरी मंजूर करा

कोरपना :- तालुक्यातील बोरगाव (इरई) येथील शेतकऱ्यांच्या शेतकपिकांचे वन्यप्राण्यांमुळे मोठे नुकसान होत आहे याकरिता भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या नेतृत्वात वनपरिक्षेत्र अधिकारी वनसडी यांच्या कार्यालयात धडक देऊन वन्यप्राण्यांपासून शेतपिकांचे संरक्षण व्हावे याकरिता वनविभागातर्फे सोलर बॅटरी मशीन मंजूर करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी अरुणा चौधरी यांना केली.#chandrapur

कोरपना तालुक्यातील अनेक गावांमध्ये रानटी डुक्कर,रोही यासारख्या वन्यप्राण्यांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान होत आहे,तसेच शेतकऱ्यांना सदर बाबींचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे,शेतकऱ्यांना आपल्या शेतमालांची राखण करण्यासाठी रात्रपाळी मध्ये जागरण करून वन्यप्राण्यांपासून आपल्या शेतातील पिकांचे संरक्षण करावे लागत आहे.तसेच शेतकऱ्यांसुद्धा वन्यप्राण्यांपासून धोका निर्माण होऊ शकतो,सदर बाब बोरगाव इरई येथील शेतकऱ्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या निदर्शनास आणून दिली.#mh34updatenews

सदर बाबीची दखल घेत भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी सर्व शेतकऱ्यांसह वनपरिक्षेत्र अधिकारी यांना सदर प्रकरणाबाबत सविस्तर माहिती देऊन निवेदन सादर केले.तसेच वन्यप्राण्यांचा त्रास हा परसोडा,पारडी,कोठोडा,जेवरा,तुळशी,गांधीनगर,कोडशी,शेरज,पिपरी,नारंडा,वनोजा,अंतरंगाव बु,सांगोडा,गाडेगाव,भारोसा,भोयगाव इत्यादी गावांना असल्याची माहिती आशिष ताजने यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दिली.
आपण यासंदर्भात योग्य चौकशी करून शेतकऱ्यांच्या पिकांचे वन्यप्राण्यांपासून संरक्षण व्हावे याकरिता सोलर बॅटरी मशीन देण्यात यावी यासाठी उपवनसंरक्षक, मध्य चांदा वनविभाग,चंद्रपूर यांच्याकडे प्रस्ताव सादर करू असे वनपरिक्षेत्र अधिकारी अरुणा चौधरी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले.

यावेळी अरुण नवले,नरेन्द्र धाबेकर,गोकुळदास बुच्चे,विनोद बावणे,सोनू बुच्चे,अजय लिगमे, लटारी खवसे, शरद बोधे,अरुण गोहोकर,पुरुषोत्तम गोहोकर,चंद्रभान बुच्चे,खुशाल नगराळे,प्रमोद देरकर,भरत पथाडे,हेमंत खुजे,गजानन चौधरी,किशोर बोधे,संजय बोधे,मारोती घोरुडे,शंकर बुच्चे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies