हल्ल्याप्रकरणी सखोल चौकशी करून पडद्यामागील व प्रत्यक्ष सहभाग असलेल्या आरोपींचा तपास करून गुन्हे दाखल करण्याची मागणी !
"त्या" दोन पत्रकारांची चौकशी करण्यात यावी !
चंद्रपूर : साप्ताहिक चंद्रपूर क्रांती तथा न्यूज पोर्टल चे संपादक संजय कन्नावार यांनी आपल्या न्यूज पोर्टल वर एका बार अँड रेस्टॉरंट मधे पत्रकारांनी दुसऱ्याच्या चिकन फ्रॉय चोरल्या ची बातमी प्रकाशित केली होती. ती बातमी अनेक न्यूज पोर्टल वर सुद्धा प्रकाशित करण्यात आली. दरम्यान या बातमी मध्ये कुणाही पत्रकारांची नावे प्रकाशित केली नव्हती पण दैनिक सकाळ चे जिल्हा प्रतिनिधी प्रमोद काकडे व सर्च टीवी चे प्रतिनिधी पवन झबाडे हे पोलीस स्टेशन मधे जावून आमची काही पोर्टल मध्ये बातमी प्रकाशित करून बदनामी करीत असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती. यानंतर पोर्टल च्या काही संपादक यांच्या विरोधात तोंडी तक्रारी जिल्हा पोलीस अधिक्षक व खासदार आमदार यांच्याकडे देण्यात आल्या पण त्या पत्रकारांनी लेखी तक्रार दिली नाही कारण ज्यावेळी ते पत्रकार दुपारच्या वेळी बार मध्ये दारू पीत होते त्यावेळी ते आपल्या कर्तव्यावर होते त्यामुळे ते लेखी तक्रार देऊ शकले नाही.
पत्रकाराने पत्रकाराबाबत केलेल्या बातम्या या काही नवीन नाही पण दुर्गापूर परिसरातील इमली बार जवळ शिवसेना जिल्हा प्रमुख संदिप गिऱ्हे यांनी संजय कन्नावार यांना मारहाण करण्यासाठी बाहेरच्या गुंडा कडून एका संपादकांवर प्राणघातक हल्ला केला हे लोकशाहीला घातक असून खुलेआम फोन करून हल्ला करणे हे पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणारी बाब आहे, कारण पत्रकारांवर हल्ला म्हणजे लोकशाही वर हल्ला आहे आणि म्हणून संजय कन्नावार यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याची सखोल चौकशी करून दोषींवर पत्रकार संरक्षण अधिनियम अंतर्गत व इतर कलमांवये गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित अटक करण्यात यावी अन्यथा डिजिटल पोर्टल असोशिशन व संपूर्ण पत्रकार संघटना पोलीस प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करतील असा इशारा पत्रकार परिषदेत देण्यात आला. याबद्दलचे निवेदन पोलिस अधिक्षकांना देऊन जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना सुद्धा देण्यात आले व सविस्तर चर्चा करून संजय कन्नावार यांच्या वर प्राणघातक हल्ला करणाऱ्या व पडद्यामागे सूत्रधार असणाऱ्या सर्वांवर पत्रकार सरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करावी व त्यांना अटक करावी अशी मागणी परिषदेत मागणी करण्यात आली, यासंदर्भात पालकमंत्री महोदयांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा करण्यात आली.
निवेदनाच्या प्रती राज्याचे यूहमंत्री दिलीप वळसे पाटील.जिल्ह्याचे पालकमंत्री विजय भाऊ वडेट्टीवार. लोक लेखापाल समिती चे अध्यक्ष सुधीरभाऊ मुनगंटीवार, पोलीस महानिरीक्षक यांना देण्यात आले आहे.