आज दि.१५ आगस्ट रोज रविवार ला मुल तालुका अंतर्गत येत असलेल्या येरगाव ग्रामपंचायत च्या वार्ड क्रं-३ येथील अंगणवाडी च्या सर्व विद्यार्थ्यांना ७५ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रा.पं. सदस्य पंकज गेडाम व नवयुवक संघटन रेगडी येथील यूवक तर्फे पुर्ण गणवेश व जूते वाटप करण्यात आले . कार्यक्रमाचे ध्वजारोहण मुर्ती पंकज गेडाम यांनी केले व संचालन प्रा.शेखर कूळमेथे व आभार प्रदर्शन आकाश पेन्दाम यांनी केले या वेळेस कार्यक्रम ला उपस्थित आदिवासी समाज अध्यक्ष निलेश गेडाम, उपाध्यक्ष रवि कन्नाके,सचिव आकाश पेंन्दाम व ज्येष्ठ अभियंता अमर कुळमेथे यांनी राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी सदैव तयार राहावे असे मत दर्शवले, सामाजिक कार्यकर्ते कपूरदासजी गेडाम यांनी राजकारणाचा माध्यमातून समाजसेवा करावी असे मार्गदर्शन केले , देवानंद जी कूळमेथे यांनी स्वातंत्र्याच्या चळवळी बद्दल सागत स्वातंत्र्य चे महत्व अनंत असल्याचे सांगितले सामाजाचे आधार स्तंभ म्हणून नेहमी सोबत असले ले शशीकांत गेडाम, अभिषेक पेन्दाम,अक्षय गेडाम,
अंगणवाडी सेविका सौ.वेनूताई कुळमेथे, मदतनीस जाईबाई मडावी,माजी ग्रा.स.प्रियंका गेडाम, रेखाताई गेडाम ,निता ,सोनू करण गेडाम,प्रज्वल कन्नाके स्वप्नील,भक्तदास,नयन, श्रीकांत,अनुराग, पुष्पाताई,नलीना,शेशीकला व इ.गावातील नागरिक उपस्थित होते.