कारवाई झालीच नसल्याचे वनविभागाचे स्पष्टीकरण !
लेण-देण मधून प्रकरण दडपले असल्याचे चर्चेला उधाण !
चंद्रपूर (वि.प्रति.)
चंद्रपूर शहरातील मुल रोडवरील बंगाली कॅम्प परिसरात एका इसमाच्या घरी हरिना चे मास ठेवले असल्याची गुप्त माहिती शनिवार दि.७ रोजी वनविभागाला मिळाली. सदर माहितीच्या आधारे वनविभागाने धाड टाकली असता त्या ठिकाणाहून काही मास नावाने "वाघ" असलेल्या इसमाच्या घरून उपलब्ध झाल्याचे व आलेल्या कर्मचाऱ्यांनी हे मांस टेस्टिंग साठी नेल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. परंतु यासंदर्भात चांदा वन विभागाचे पठाण यांचेकडे चौकशी केली असता अशी गुप्त माहिती मिळाली होती, त्या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी कर्मचारी धाडले होते परंतु काहीही आढळले नाही व कर्मचारी रिकाम्या हाताने परत आल्याचे पठाण यांनी प्रतिनिधी ला सांगीतले. वनकर्मचारी रिकाम्या हाताने परत गेलेच नाही. असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. ? मिळालेल्या माहितीनुसार त्या ठिकाणाहून 26 किलो मांस जप्त करण्यात आले. मग कारवाई केलेले मास गेले कुठे ? याचा तपास वरिष्ठ वन अधिकाऱ्यांनी करायला हवा. महत्त्वाचे म्हणजे ही सर्व कारवाई होतांना दोन पत्रकारांची त्याठिकाणची उपस्थिती व मास दडपण्याचे प्रकरण आता वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या अंगलट येऊ शकते. या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर चौकशी झाल्यास "अख्खं हरिण वनकर्मचाऱ्यांनीच गिळले." असल्याचे निष्पन्न होईल, यात शंका नाही. विशेष बाब म्हणजे असे मास वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कारवाईसाठी घटनास्थळावरून नेल्याची माहिती शनिवारी रात्री वनविभागाचे प्रादेशिक वनाधिकारी यांना देण्यात आली होती. याची कल्पना बहुतेक घटनास्थळी गेलेल्या वन कर्मचाऱ्यांना नसावी म्हणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्या जात आहे.सदर प्रकरणात या परिसरातील काही प्रतिष्ठित गोवण्याची भीती असल्यामुळे सदर प्रकरण रफादफा करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.