Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

पाइपमध्ये दबून युवकाचा मृत्यू





खडसंगी: चिमूर वरोरा राज्यमहामार्गावरील कब्रस्थानजवळ ठेवलेल्या पाइपमध्ये दबून गणेश वाल्मिक नैताम (३४) या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी घडली.

वरोरा या राज्य माहामार्गावरील हिंगणघाट वळणावर कब्रस्थानजवळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा योजनेच्या पाइपचा साठा अनधिकृतपणे ठेवण्यात आला आहे. बुधवारी खडसंगी येथील गणेश वाल्मिक नैताम हा युवक याठिकाणी उभा होता. यावेळी पाण्यामुळे अनेक पाइप एकावर एक घसरत जाऊन त्याच्या अंगावर पडले. या पाइपमध्ये दबून त्याचा मृत्यू झाला. सदर पाइप महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजना व एजीपीजी (पिंजवानी ) असोसिएशन अकोला या कंपनीचे असून, अनधिकृतपणे पाईप ठेवल्यामुळेच मृत्यू झाला असे गावकऱ्यांचा आरोप आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies