चंद्रपूर:- आम आदमी पार्टी चे विधानसभा प्रमुख तथा जिल्हा उपाध्यक्ष हिमायु अली यांचे नेतृत्वात जिल्हाध्यक्ष सुनील देवराव मुसळे यांचे मार्गदर्शनात दिनांक 2/8 /21 रोजी सराई मार्केट जटपुरा गेट ईथून कचरा संकलन केंद्र हटविण्यासाठी जन आंदोलन करण्यात आले.आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने जिल्हा अधिकारी मार्फत विभागीय आयुक्तांना निवेदन पाठविले .
चंद्रपूर शहर मनपा चंद्रपूर शहर चा कचरा सराय मार्केट येथे जमा करून पुन्हा तिथून दुसरीकडे हलविला जातो त्यामुळे दिवसभर कचरा जमा असल्यामुळे दुर्गंधी येत असते व आजूबाजूच्या परिसरातील जनतेला व व्यापाऱ्यांना बिमारी चा त्रास होत असतो .याची तक्रार आम आदमी पार्टीने मनपा आयुक्ताकडे दिनांक 26/ 7/ 21 रोजी केली. सात दिवसाच्या आत कचरा संकलन केंद्र हटविण्याबाबत मागणी करण्यात आली .आयुक्ताने लवकरात लवकर कार्यवाही करू असे सांगितले परंतु सात दिवस लोटून सुद्धा चंद्रपूर मनपाचे आयुक्त कडून कुठलेही कार्यवाही न केल्यामुळे आज हे जन आंदोलन करण्यात आले. येत्या काही दिवसात तोडगा न निघाल्यास पुन्हा जनतेला सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांनी केला. आंदोलनात जिल्हाध्यक्ष- सुनील मुसळे, जिल्हा संघटन मंत्री- राजेश बेले, जिल्हा उपाध्यक्ष; हीमायु अली, जिल्हा सचिव- संतोष दोरखंडे, जिल्हा युवा अध्यक्ष- मयूर राईकवार,जिल्हा कोषाध्यक्ष- भिवराज सोनी, बल्लारपूर शहराध्यक्ष-रवी पप्पुलवार, संजीव खोबरागडे, सिकंदर सागोरे ,अमित बोरकर, योगेश आपटे ,सुनील भोयर ,अफजल अली, बबन कृष्णपल्लीवार ,दिलीप तेलंग समशेर सिंग ,अजय डुकरे तसेच अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते