हत्या व बलात्कारातील आरोपींची संख्या लक्षणीय
चंद्रपूर : चित्रपटसृष्टीतील कथानकाचे अनुकरण, वाढती बेरोजगारी, दारिद्र्य, झटपट पैसे कमविण्याच्या नादात आजची युवा पिढी गुन्हेगारीच्या विळख्यात अटकत आहे. जिल्हा कारागृहात दाखल असलेल्या एकूण 499 बंदिवानात हत्येचे 140, चोरीचे 157, बलात्काराचे 92 बंदिवान आहेत.विशेष म्हणजे यामध्ये 18 ते 30 वयोगटातील सुमारे 70 टक्के बंदिवान आहेत. देशाचे भविष्य घडविणाऱ्या युवकांचे हात विविध गुन्ह्यांनी रंगले असल्याची चिंताजनक बाब आहे. जिल्ह्यातील बहुतांश उद्योग बंद आहेत. शासनाकडून नोकरभरतीसुद्धा बंद आहे. परिणामी बेरोजगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.(#Chandrapur District Jail)
दुचाकी चोरी, घरफोडी, मोबाइल चोरीचे गुन्हेगार वाढत आहेत. कारागृहातून आरोपी बाहेर गेल्यानंतर एक सुजाण नागरिक बनावा यासाठी कारागृहातर्फे समुपदेशन करण्यात येत असते. मात्र अनेकदा आरोपी बाहेर पडल्यानंतर त्याच्यात कुठलाच बदल न दिसता तो दुसऱ्या प्रकरणात आरोपी बनत असल्याचं वास्तव आहे.(The number of accused in murder and rape is significant)
29 महिला बंदिवान
जिल्हा कारागृहात चोरी प्रकरणामध्ये 18, हत्येच्या प्रकरणात 7, आम्लपदार्थ तस्करी प्रकरणांत चार महिला बंदिवान आहेत. बेरोजगारी, दारिद्र्य, अशिक्षितपणा आदीमुळे अनेकजण वाईट मार्गाला लागत असल्याचे कारागृहातील बंदिवानावरून दिसून येते.
18 ते 30 वयोगटातील सर्वाधिक बंदिवान
जिल्हा कारागृहात 438 व कोरोनामुळे तयार केलेल्या टेम्पररी कारागृहात ६1 असे एकूण 499 बंदिवान आहेत. यामध्ये 18 ते 30 वयोगटातील 70 टक्के बंदिवान आहेत. त्यानंतर 35 ते 40 वयोगटातील बंदिवान आहेत.