Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे १७ वर्षीय युवतीचा मृत्यू




गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथील कोंडुजी अनमुलवार यांच्या सानिका या मुलीला रक्ताची कमतरता असल्याने चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उपचारासाठी आणण्यात आले होते. तेथील कर्मचाऱ्यांनी तिला दाखल करून घेतले. वार्डात बेडसुद्धा देण्यात आला. मात्र, तासभराचा कालावधी लोटूनही डॉक्टर तेथे आले नाही. आणि उपचाराअभावी त्या १७ वर्षीय युवतीचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता. २१) दुपारच्या सुमारास चंद्रपुर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली. सानिका कोंडुजी अनमुलवार असे मृत मुलीचे नाव आहे. 



डॉक्टर वेळेवर  उपलब्ध नसल्याने युतीच्या मृत्यू झाल्या यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालय येथे भाजप युवा मोर्चाचे जिल्हा महामंत्री सुनील डोंगरे यांनी संबंधित डॉक्टरांना चांगलेच धारेवर धरले दोषी डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी मृत्यू देह जिल्हा सामान्य रुग्णालयातील खाटेवर अडवून धरला. मृतक युतीच्या कुटुंबीयांनी रुग्णालयातील सुविधेविरोधात संताप व्यक्त करीत दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.#mh34updatenews

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies