चंद्रपुर :- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या चंद्रपुर जिल्हा समन्वयकपदी चंद्रपुर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा तडफदार कार्यकर्ते श्रीधर कष्टी यांची जिल्हा समन्वयक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील तथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे यांच्या मान्यतेने तसेच राज्यातील सर्व विभागीय अध्यक्ष आणि सर्व जिल्हाध्यक्ष यांच्या संमतीने राज्यातील सर्वच जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, महाराष्ट्र प्रदेशच्या रोजगार उपक्रमाच्या जिल्हा समन्वयकांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये चंद्रपूर जिल्हा समन्वयक पदावर श्रीधर कष्टी यांची वर्णी लागली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा शरद पवार, अजित पवार आणि खा. सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून जिल्ह्यातील विद्यार्थी विद्यार्थिनींना आणि युवक युवतींना रोजगार मिळवून देण्यासाठी आपण कार्य करू, असे नवनियुक्त जिल्हा समन्वयक श्रीधर कष्टी यांनी सांगितले.