चंद्रपूरातील दारुबंदी उठविण्यात आल्याने शहरातील अनेक बिअरबार व देशी दारुची दुकाने सुरु झाली आहे. त्यामूळे दारू दुकानासमोर गर्दी होत असल्याने वाहतूक व्यवस्थेवर याचा परिणाम होत आहे. तसेच अनेक नव्या समस्या उद्भवण्याची शक्यता आहे हि बाब लक्षात घेता उद्भवत असलेल्या तसेच भविष्यात उद्भवणार असलेल्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांची भेट घेत केल्या आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे संघटक विश्वजित शाहा, शंकर वराडकर यांची उपस्थिती होती.
चंद्रपूकरांची मागणी लक्षात घेता जिल्हातील दारुबंदी उठविण्यात आली आहे. त्यानूसार जिल्हातील दारु दुकाने सुरु करण्यात आली आहे. मात्र काही बार मालक व देशी दुकान मालक दुकानाबाहेरच दारु विक्री करतांना दिसून येत आहे. तर काही मद्यविक्रीच्या दुकांनापूढे मध्यप्रेमींची गर्दी होत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत. याकडे पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे आ. जोरगेवार यांनी म्हटले आहे. या सबंधित त्यांनी आज पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांची भेट घेतली असून त्यांना अनेक महत्वाच्या सुचना केल्या आहे. दारु सुरु झाल्याने अवैध दारु विक्री करणा-या गुंड प्रवृतीच्या लोकांकडून गुन्हेगारीच्या घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामूळे त्यांच्याकडेही पोलिस प्रशासनाने लक्ष ठेवावे तर काही अतिउत्साही मध्यप्रेमींमूळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अशावंरही लक्ष ठेवून योग्य कार्यवाही करण्याच्या सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी पोलिस अधिक्षकांना केल्या आहे.
परवानाधारकांचा उतावळेपणा !
जिल्ह्यातील दारूबंदी उठल्यानंतर परवाना धारकांच्या उतावळेपणा समोर येत आहे. 7 जुलै रोजी परवाना नूतनीकरण झालेल्या भिवापूर वार्डातील सुपर मार्केट परिसरातील एका देशी दारू दुकानदाराने चक्क परवाना नुतनीकरण होण्यापूर्वीच आपल्या दुकानाचे हारे-तुरे व बोर्ड लावून थाटात उद्घाटन केले. त्यानंतर संबंधित विभागाने त्या दुकानावर कारवाई केल्यानंतर या देशी दारू दुकानाला कागदोपत्री नेक समस्यांना सामोरे जावे लागले.
जिल्ह्यात दारूबंदी उठवल्यामुळे बार मालकाकडून विजय वडेट्टीवार यांच्या फोटोची पूजा.!
तसेच नुकतेच एका बार मालकाने काउंटरच्या बाजूला दर्शनी भागात फोटो लावून केलेल्या आरतीचा व्हिडिओ चांगलाच चर्चेत आहे.चंद्रपुरात दारुबंदी उठविल्यानंतर मद्यपींच्या आनंदाला उधाण आले आहे. आपला आनंद सेलिब्रेट करण्यासाठी चंद्रपूर शहराच्या वेशीवर असलेल्या ग्रीन पार्क बार रेस्टॉरंटमधे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची ही प्रतिमा लावण्यात आली आहे.
चंद्रपुरात पुन्हा एकदा 750 बार-रेस्टॉरंट सुरु झाले आहेत. दारुबंदी उटळ्यानंतर पहिल्या 3 दिवसात मद्यप्रेमींनी 1 कोटींची दारु रिचवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर गेली 6 वर्षे अत्यंत तोट्याची गेली, अशी भावना बारमालकांनी व्यक्त केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी दारुबंदी उठवून मद्य व्यावसायिक, बारमालक, त्यावर आधारित रोजगार यांना चालना दिली आहे. विजय वडेट्टीवार यांचे हे उपकार कधीही विसरणार नाही, अशी प्रतिक्रिया बारमालकांनी दिली आहे.