Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

रामसेतू नावात चंद्रपूरकरांच्या मनातील भावना उपमहापौर राहुल पावडे यांचा नगरसेवक पप्पू देशमुख यांना टोलारामभक्तांची दिशाभूल, प्रसिद्धीचे आरोप करणे हास्यास्पद

चंद्रपूर : नवीन चंद्रपूर आणि जुन्या चंद्रपूरला जोडणाऱ्या इरई नदीवरील पुलाला रामसेतू नाव देण्याचा ठराव मनपाने घेतला आहे. रामसेतू या नावात अनेकांच्या मनातील भावना जुळल्या आहे. चंद्रपूरकर जनतेच्या भावनांचा आदर करीत रामसेतू नाव देण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. चंद्रपूर शहर महानगर पालिकेने घेतलेला हा ठराव प्रसिद्धी मिळविण्यासाठी आहे असे नगरसेवक पप्पू देशमुख यांचे म्हणणे हास्यास्पद असल्याचा टोला उपमहापौर राहुल पावडे यांनी हाणला आहे.

चंद्रपूर शहर महानगर पालिकेची हद्द दाताळा रोडवरील इरई नदी पर्यंत आहे. या पुलाच्या बाहेरील भागात दाताळा व अन्य गावे आहेत. या गावातील नागरिक रोजगार व अन्य लहान-मोठ्या कामासाठी चंद्रपूर शहरात येत असतात. तसेच म्हाडाची मोठी वसाहतही आहे. त्यामुळेच या भागाला नवीन चंद्रपूर म्हणून संबोधले जाते. या नदीवरील आधीचा पूल खोलगट भागात असल्याने पावसाठ्याच्या दिवसात या गावातील नागरिकांचा चंद्रपूर शहराशी संपर्क तुटत होता. त्यामुळे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आपल्या अर्थमंत्री पदाच्या कार्यकाळात नवीन पुलासाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाचे बांधकाम केले.

आजघडीला हा पूल नागरिकांच्या सेवेत आहे. त्यामुळे चंद्रपूरकर जनतेने या पुलाला रामसेतू नाव देण्याची मागणी केली. रामसेतू या नावात बहुसंख्य चंद्रपूरकरांच्या भावना जुळल्या आहेत. त्यामुळे कोणताही उद्देश न ठेवता केवळ भावनांचा आदर करीत मनपाने रामसेतू नावाचा ठराव घेतला आहे. हा पूल चंद्रपूर शहर महानगर पालिकेचा नसला म्हणे कितपत योग्य तरी, याच पुलात गणेशमूर्ती, देवीच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते. त्या परिसरात मनपाकडून काही कामेसुद्धा केली जातात. या सोबतच सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पूल बांधला असला, तरी या पुलावरील पथदिव्यांच्या देखभाल, दुरुस्तीची जबाबदारी ही चंद्रपूर शहर महानगर पालिकेकडे खुद्द सार्वजनिक बांधकाम विभागानेच सोपविली आहे. त्यामुळे यात महानगर पालिकेचे काहीही काम नाही, असे देशमुख यांचे म्हणणे चुकीचे आहे.

त्यामुळे रामसेतू या नावाचा ठराव घेण्यात कुठलीही चूक नसून, संबंधित कार्यालयांशी या संदर्भात पाठपुरावा केला जाणार असल्याचेही उपमहापौर राहुल पावडे यांनी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies