महाराष्ट्रात कोकण सातारा कोल्हापूर सांगली मराठवाडा आणि विदर्भात पावसाने प्रचंड धुमाकूळ घातल्याने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे वळपास ३३ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान पावसाने झाले असून शेतकऱ्यांचे खूप मोठे फटका या पावसामुळे बसला आहे, त्यामुळे तात्काळ पंचनामे करून लगेचच भरीव मदत मिळणे गरजेचे आहे, तसेच शासनाकडून देण्यात येणारी मदत हे तुटपुंजी असून प्रत्यक्षात मात्र तीही मदत नुकसानग्रस्त पर्यंत सहा सहा महिने पोहोचत नाही. तसेच शासनाने ओला दुष्काळ किंवा कोरडा दुष्काळ जाहीर करूनही पिक विमा सुद्धा दिला जात नाही. दुष्काळी भागात शेतकऱ्याचे उत्पन्न सरासरी पेक्षा जास्त असल्याने विमा देत नाही असे कारण सांगून अनेक वेळा विम्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नाही शासन व विमा कंपनी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची अनेकदा दिशाभूल करते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन तोंडी आश्वासन दिले जाते परंतु मदत पोहोचत नाही याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यानी शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून नुकसान ग्रस्त कोरडवाहू शेतीला पंच्याहत्तर हजार हेक्टरी, बागायती शेतीला एक लाख प्रति हेक्टर व फळबागांसाठी दीड लाख रुपये प्रति हेक्टर याप्रमाणे मदत करावी व शेतकर्यांना आत्महत्येपासून वाचवावे अशी मागणी मनसे शेतकरी सेनेचे अध्यक्ष संतोष नागरगोजे यांचे मार्गदर्शनात मनसे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार केली यावेळी महिला सेना जिल्हाध्यक्ष सुनिता ताई गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य विवेक धोटे, शहर संघटक मनोज तांबेकर, मनवीसे शहर उपाध्यक्ष पियुष धुपे, शैलेश सादलावर, मनवीसे तालुकाउपाध्यक्ष करणं नायर, कृष्णा गुप्ता, विभागाध्यक्ष तुषार येरमे, अर्चना आमटे, वर्षा भोमले हे उपस्थित होते.
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी - मनसे
जुलै ३०, २०२१
0
Tags