चंद्रपूर : राज्य शासनाने जिल्ह्यातील दारूबंदी उठविल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाने परवाने देणे सुरू केले. जिल्ह्यात ९८ दारू परवाने मिळाले असून आज आणखी ५० जणांना परवानगी मिळणार आहे. ज्यांना परवानगी मिळाली आहे, ते दारू विकण्यास मोकळे झाले आहे. मात्र त्यांच्याकडे दारूचा स्टाॅक नाही. शनिवार, रविवारी टाळेबंदी असल्याने परवानाधारक परवानगी मिळूनही दारूची आयात करू शकले नाही. मात्र आज दुपारपर्यंत जिल्ह्यात अधिकृत दारू येण्याची शक्यता आहे. त्यानंतरच दारूची दुकानातून विक्री सुरू होणार आहे.
आज पासुन चंद्रपूर जिल्ह्यातील ९८ बार दारू विक्री साठी सज्ज
जुलै ०४, २०२१
0
Tags