Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

पाच ऑगस्ट रोजी मनपाच्या झोन सभापतींची निवड



चंद्रपूर, ता. ३० : चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या झोन क्रमांक एक, दोन आणि तीनच्या सभापतीपदासाठी येत्या पाच ऑगस्ट रोजी निवड होत आहे. मनपाच्या नवीन प्रशासकीय इमारतीत राणी हिराई सभागृहात पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २९ अ-(४) अन्वये विभागीय आयुक्त नागपूर विभाग नागपूर चे पत्र क्रमांक एमयुएन/१९/(२) कावि- २०५/२०२१ दि. २६ जुलै २०२१ अन्वये २०२१-२२ साठी चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूरच्या प्रभाग समिती क्रमांक एक, दोन आणि तीन मधील सदस्यांतून प्रभाग समिती सभापती यांची निवड करण्यासाठी ऑनलाईन विशेष सभा ता. ५ ऑगस्ट रोजी मनपाच्या नवीन प्रशासकीय इमारतीत राणी हिराई सभागृहात पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे.

प्रभाग समिती एकसाठी सकाळी ११ वाजता, प्रभाग समिती दोनसाठी दुपारी १२ वाजता, प्रभाग समिती तीनसाठी दुपारी १ वाजता सभा होत आहे. सभापती निवडीसाठी कोरे नामनिर्देशन पत्र दोन ऑगस्ट ते तीन ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत नगर सचिव यांच्या कार्यालयात उपलब्ध राहतील. ४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत नगर सचिव यांच्या कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करता येईल. पाच ऑगस्ट रोजी नामनिर्देशन पत्राची छानणी ऑनलाईन विशेष सभा सुरु झाल्यावर होईल. छाननीनंतर १५ मिनिटाच्या कालावधीत नामनिर्देशन पत्र मागे घेता येईल. त्यानंतर त्याच दिवशी आवश्यकता भासल्यास मतदान होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies