चंद्रपूर :- 27 जून ला राज्य मंत्रिमंडळाने चंद्रपुरातील दारू बंदी उठविण्याचा निर्णय घेतला त्यानंतर ८ जुनं ला या संदर्भातला शासन निर्णय जाहीर करण्यात आला. प्रशासनाने दारूविक्री परवाना धारकांना नूतनीकरनासाठी आवाहन केले होते. त्यानंतर परवाना धारकांनी आपले परवाने नूतनीकरण करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडे कागदोपत्री पूर्तता केली. त्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर सोमवारपासून चंद्रपूर जिल्ह्यातील 98 दारू दुकाने सुरू होणार आहेत. ही 98 दुकाने पहिल्या टप्प्यात सुरू होणार असून उर्वरित दुकाने दुसऱ्या टप्प्यात सुरू होणार आहेत. दारूची दुकाने आत्ता सुरू होईल नंतर सुरू होईल याची प्रतीक्षा मद्यपी बघत होते. चंद्रपूरातील दारूची दुकाने सुरू होण्यासाठी आता सोमवारपर्यंत वाट बघावी लागणार आहे.
सोमवारपासून चंद्रपूर जिल्ह्यातील 98 दारू दुकाने सुरू होणार
जुलै ०३, २०२१
0
Tags