जिल्ह्यात काल दुपार पासून विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. यात गेल्या 24 तासात पाच शेतकऱ्यांचा वीज पडून मृत्यू झाला.
मूल तालुक्यातील बोंडाळा गावात आज वीज पडून दोन शेतकरी ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली मृतक शेतकऱ्याचे नाव विलास केशव नागापुरे (५०) व गयाबाई पोरटे (६०) असे आहे तर काल चंद्रपूर तालुक्यातील सोनेगावच्या शेतात काम करीत असलेल्या गोवर्धन किशन गोहणे (वय ३५) या शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाला; तर कोरपना तालुक्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये भीमराव मारू मडावी (वय ४०) आणि कवडू मोहुर्ले (वय ३६) यांचा समावेश आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात वीज पडून पाच शेतकऱ्यांच्या मृत्यू
जुलै ०१, २०२१
0
Tags