Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

चंद्रपूर मुल राष्ट्रीय महामार्गाच्या निष्कृष्ट दर्जाच्या कामासाठी भाजप कार्यकर्त्यांनी अडवला रस्ता




तासभर रस्ता अडवून केले आंदोलन पोलिसांच्या मध्यस्थीने महामार्ग चालू


चंद्रपूर मुल या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षापासून कासवगतीने सुरू आहे या कामामुळे रहदारी करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे त्याच बरोबर या राष्ट्रीय महामार्गाचे काम निष्कृष्ट दर्जाचे असल्याच्या अनेक तक्रारी राष्ट्रीय महामार्गाच्या उपविभागीय कार्यालयात करण्यात आल्या परंतु संबंधित अधिकारी यांच्याकडे साफ दुर्लक्ष करीत आहे आज इंदिरानगर येथे रात्री आठ वाजता या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होते जुन्या डांबरीकरण रस्त्यावरतीस डांबर टाकण्यात आले होते व चुरी टाकून हा रस्ता तयार करण्यात येत होता नुसत डांबर टाकून चूरी टाकल्यानंतर हा रस्ता किती दर्जेदार बनेल हे एखाद्या शेंबड्या पोराचा देखील लक्षात येते परंतु अधिकाऱ्यांच्या लक्षात का येत नाही आज या प्रकारामुळे इंदिरानगर येथे दोन एक्सीडेंट झाले एक महिला रस्त्यावर पडले तिला गंभीर दुखापत झाली हे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा बंगाली कॅम्प मंडळ अध्यक्ष संजय पटले यांच्या लक्षात आले त्यांनी रस्त्याचे काम करीत असलेल्या कामगारांना याबाबत विचारणा केली असता कामगारांनी तिथून पळ काढला त्यानंतर संजय पटले यांनी तासभर रस्ता अडवून धरला व सदर कामाची चौकशी करावी अशी मागणी केली घटनास्थळी रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस दाखल झाले व संजय पटले यांची मध्यस्थी केली त्यानंतर या रस्त्यावरील वाहतूक सुरू झाली आता सर्वसामान्य नागरिकांना प्रश्न पडू लागला आहे सदर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने कामाची चौकशी होणार काय ?





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies