निकृष्ट दर्जाच्या कामांना मत्ते यांचा आशीर्वाद !
चंद्रपूर : राष्ट्रीय महामार्गाचे काम हे मजबूत व्हावे यासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे नेहमी प्रयत्नशील असतात. परंतु शासकीय अधिकारी या ठिकाणी हाय गय करीत असल्यामुळे राष्ट्रीय महामार्गाचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असते याचे जिवंत उदाहरण म्हणजे चंद्रपूर शहरातील चंद्रपूर ते मूल जाणारा मार्गे डांबरीकरणाचे रस्ता आहे. एमएसईबी, बंगाली कॅम्प ते मूल मार्ग हा राष्ट्रीय महामार्गचे काम मागील काही महिन्यापासून सुरू आहे, व त्यांचे काम हे निकृष्ट दर्जाचे आहे. या मार्गाविषयी अनेक तक्रारी राष्ट्रीय महामार्गाच्या चंद्रपूर येथे असलेल्या उपविभागीय कार्यालयात करण्यात आल्या असून उद्या पाहतो असा गोड बोला सल्ला देऊन भत्ते यांचेकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय महामार्गाचे काम मत्ते या कार्यकारी अभियंत्याकडे आहे आणि मतेचे रहाणे सुद्धा या मुल मार्गावरच आहे .येता जाताना त्यांना या मार्गाची अवस्था कळत असते परंतु जाणून-बुजून त्याकडे कानाडोळा करतात आणि तक्रारी मात्र कचऱ्याच्या कुंडीत टाकतात. गोडबोला असलेला मत्ते याच्या आशीर्वादाने हे कार्य सुरू असल्याचे सांगितले जाते. सहा जून रोजी इंदिरानगर समोर डाव्या हातावर मुख्य मार्गावर मुरमाच्या चूरा भरून काम सुरू असल्याचे एका सामाजिक कार्यकर्त्याच्या ध्यानात आल्यानंतर त्यांनी मते यांना फोन केला असता त्यांनी मी दोन दिवस सुट्टीवर असून मला याबद्दल कोणतीही कल्पना नसल्याचे सांगितले.
महत्त्वाचे म्हणजे या मार्गाविषयी अनेक तक्रारी मत्ते यांना करण्यात आल्या आहेत. यापुढे मत्ते यांच्या कार्यालयात एका राजकीय पक्षाने मोठे आंदोलन केले होते परंतु मुजोर मत्ते या आंदोलनाला न जुमानता कंत्राटदाराशी असलेले त्यांचे लागेबांधे जोपासण्यामध्येच मशगुल आहेत. याच मार्गावर मत्ते यांचे घर आहे त्यांचे नेहमीचे जाणे-येणे याच मार्गावरून होत असते. यांच्या घराशेजारी असणारा रस्ता हा कसा बनवत आहे याची त्यांना कल्पना नसावी असे कदापीही शक्य नाही या मार्गावर अनेक जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. मत्ते यांनी या गोष्टीचे भान ठेवावे अपघातात मृत्यू पावणारे निर्दोष होते. मत्ते यांनी आपल्या कर्तव्याचे पालन करावे व यानंतर होणारे अपघात होऊ नये यासाठी कटिबद्ध राहावे अन्यथा मत्ते यांच्या घरासमोर पत्रकार संघाच्या माध्यमातून आंदोलन पुकारल्या जाईल.