महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेनाचे उपसरचिटणीस राहुल बेले यांची ऊर्जाराज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे मागणी
मार्च 2019 ला भारतामध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आणि त्याविरुद्ध लढण्यासाठी भारत सरकारचे आणि महाराष्ट्र राज्यचे अथक प्रयत्न सुरु झाले आणि त्याविरुद्ध लढण्यासाठी सरकारला जे जे मदत करत होते त्यांना फ्रंटलाईन वर्कर चा दर्जा देण्यात आला . व त्याला फ्रंटलाईन वर्कर च्या सगळ्या सोयी सुविधा देण्यात आल्या.
अशा कोरोना महामारी मध्ये महानिर्मिती महावितरण आणि महापारेषण कसल्याही प्रकारचा कांगावा न करता 24 तास बिना वीज निर्मिती लॉकडाऊन काळात घरात असलेल्या सर्व जनतेला आणि दवाखान्या करीता अहोरात्र 24 तास बिना खंडित वीज पूरवठा करत होते.
परंतु याची दखल कुणालाही वाटली नाही परिणामी फ्रंटलाईन वर्करचा दर्जा न मिळ्ल्यामुळे वेळेत कर्मचारी व अधिकारांच्या कुटुंबना लसीकरण होऊ शकले नाही त्यामुळे बऱ्याच कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला . अजून सुद्धा बरेच जणांचे प्राण जात आहेत. महानिर्मिती महावितरण व महापारेषण कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर मध्ये सामावुन घेऊन सर्व कर्मचाऱ्यांना व त्याचा कुटूंबयाचे लसीकरण करण्यात यावे व सर्व सुविधा देणायत यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता सेनाचे उपसरचिटणीस राहुल बेले यांची ऊर्जाराज्य मंत्री प्राजक्त तनपुरे याना निवेदन देऊन मागणी केेली