Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

स्वतंत्र भारताच्या इतिहासातील काळा दिवस म्हणजे आणीबाणी! - सत्यम गाणार सचिव भाजप युवा मोर्चादेशातील संविधानिक मूल्यांना पायदळी तुडवून हुकूमशहा इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी आजच्याच दिवशी १९७५ साली जाहीर केली. या आणीबाणीत देशाच्या विरोधी पक्षातील नेत्यांना तर अटक करण्यात आलीच पण सामान्य नागरिकांनी देखील अनन्वित अत्याचार सहन केले. लाखो लोकांची जबरदस्तीने नसबंदी करण्यात आली, शहराच्या सुशोभीकरणाच्या नावाखाली गरिबांची घरे जमीनदोस्त करण्यात आली. एका आई व मुलाने मिळून संपूर्ण देशाची छळछावणी करून टाकली.

१९७५

१२ जून : निवडणुकीत गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवून इंदिरा गांधी यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने दोषी ठरविले. गांधी यांनी १९७१च्या निवडणुकीत सरकारी अधिकारी आणि यंत्रणेचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. लोकसभा किंवा विधानसभेची निवडणूक लढविण्यासाठी त्यांना सहा वर्षांसाठी बंदी घालण्यात आली होती.

२२ जून : जयप्रकाश नारायण यांच्यासह अनेक विरोधीपक्षातील नेत्यांनी आणीबाणीच्या विरोधात दिल्लीत रामलीला मैदानात मोठ्या सभेचे आयोजन केले.

२४ जून : अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने काही अटी घालत स्थगिती दिली. तसेच, संसदेचे सदस्य रहण्यास इंदिरा गांधींना परवानगी दिली. मात्र संसदेच्या कामकाजात सहभागी होऊ नये असे स्पष्ट केले.

२५ जून : देशात आणीबाणी लागू केल्याची घोषणा करण्यात आली. विरोधी पक्षातील नेत्यांना अटक करण्यात आली, त्याचवेळी महत्त्वाच्या वृत्तपत्रांच्या कार्यालयांची वीज सेवा खंडित करण्यात आली.

३० जून : अंतर्गत सुरक्षा कायदा लागू करण्यात येत असल्याची अधिसूचना काढण्यात आली. आणीबाणीच्या विरोधात आवाज उठवणार्‍यांना थेट अटक करण्यास सुरुवात झाली.

१ जुलै : आर्थिक आणि सामाजिक सुधारणांसाठी २० कलमी कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली.

५ जुलै : जमात ए इस्लामी, आनंद मार्ग, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदी २६ संघटनांवर बंदी घालण्यात आली.

२३ जुलै : आणीबाणीला राज्यसभेची मंजुरी.

२४ जुलै : लोकसभेतही आणीबाणीच्या बाजूने मतदान.

५ ऑगस्ट : अंतर्गत सुरक्षा कायदा लागू करण्यात आला.

१९७६

२१ मे : न्यायालयाचा हस्तक्षेप थांबविण्यासाठी घटना दुरुस्ती करण्यात आली.

२५ ऑगस्ट : विवाहाचे वय वाढविण्याची तरदूत असलेले विधेयक मांडण्यात आले.

३ नोव्हेंबर : घटना दुरुस्ती विधेयकाला लोकसभेची मंजुरी.

१ सप्टेंबर : लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी सक्तीची नसबंदी कार्यक्रम राबविण्यास सुरुवात.

१९७७

१८ जानेवारी : लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा.

२० जानेवारी : लोकसभा विसर्जित करण्यात आली.

२४ जानेवारी : मोरारजी देसाई यांची जनता पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

११ फेब्रुवारी : राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद यांचे निधन.

२१ मार्च : आणीबाणी मागे घेण्यात आली.

१९७७ साली या देशातील जनतेने मतपेटीतून कौल देऊन देशातील सामान्य नागरिकांना छळणाऱ्या या आई व मुलाचा पराभव करून संविधानाचे खऱ्या अर्थाने रक्षण केले. 

आजच्या या काळ्या दिनी देशाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी तुरुंगवास भोगणाऱ्या सर्व शूर वीरांना, माता- भगिनींना नमन!टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies