Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

स्व. पुंडलिक उरकुडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रेनकोट, फेसशिल्ड, मास्क, स्यांनीटाईझर व शिधापत्रिका वाटप कार्यक्रम संपन्नस्व. पुंडलिकभाऊ उरकुडे हे गोरगरिब, निराधार, वंचीतांची निरंतर सेवा करणारे खरे समाजसेवक - भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे
    
 घुग्घुस :- शहराचे लोकप्रिय नेते व माजी ग्रामपंचायत सदस्य स्वर्गीय पुंडलिक उरकुडे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ शुक्रवार दिनांक 18 जुन 2021 ला घुग्घुस येथील मा.आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपा जिल्हाध्यक्ष श्री. देवराव भोंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत घुग्घुस नगरपरीषदेच्या कोविड रुग्णांचे अंतिम संस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार, सफाई कर्मचाऱ्यांना मोफत रेनकोट, फेसशिल्ड, मास्क, सेनीटाईझर वाटप व लाभार्थ्यांना शिधापत्रिका वाटप करण्यात आले.

यावेळी स्व. पुंडलिक उरकुडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्व मान्यवरांनी अभिवादन केले व दोन मिनिट मौन ठेऊन श्रद्धांजली वाहिन्यात आली.

यावेळी मनोगत व्यक्त करतांना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले घुग्घुस शहराचे लोकप्रिय नेते स्व. पुंडलिक उरकुडे हे असे पदाधिकारी होते जे गोरगरिबांच्या सेवेत निरंतर राहत होते व त्यांना सतत मदत करीत होते. त्यांच्या जाण्याने पक्षाची खूप मोठी हानी झाली. आपल्या काळात आरोग्य शिबीराचे काम असेल, शिधापत्रिकाचे काम असेल सर्व क्षेत्रात गरिबांचा आधार म्हणून कार्य करीत होते. आपले आयुष्य त्यांनी गरिबांच्या सेवा कार्यासाठी वाहिले. त्यांचा प्रथम स्मृतीप्रित्यर्थ गोर गरिबांना मदत करीत सेवा करण्याचे काम आम्ही करीत आहोत.

प्रास्ताविक करताना भाजपा युवामोर्चा जिल्हामहामंत्री विवेक बोढे म्हणाले स्व. पुंडलिक उरकुडे यांनी अनेक शासनाच्या योजना गोरगरीब लोकांपर्यंत पोहचविल्या. त्यांची आठवण येताच गहिवरून येत आहे. ते मोठया व्यक्तिमत्वाचे धनी होते. ते तंमुस निवडणुकीत सर्वानुमते निवडून आले होते. ग्रामपंचायतिच्या पोट निवडणुकीत ते आपला वार्ड सोडून दुसऱ्या वार्डातून निवडून आले होते, इतकी मोठी लोकप्रियता त्यांची होती. पक्षाच्या होणाऱ्या सभांना आलोट गर्दी ते करीत होते. या सेवा कार्याच्या माध्यमातून मी त्यांना अभिवादन करतो.

घुग्घुस नपचे कर्मचारी व सफाई कर्मचारी कोरोना काळातही आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना योध्या सारखे काम करीत आहेत, त्यांच्या सन्मानार्थ त्यांना शाल, श्रीफळ, रेनकोट, फेसशिल्ड, मास्क, सेनीटाइझर देऊन सत्कार करण्यात आला.
मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राच्या वतीने येथील गोर गरीब गरजू लाभार्थ्यांना मोफत शिधापत्रिका काढून देण्यात आली होती, त्याचे ही वाटप करण्यात आले आहे.

यावेळी नकोडा सरपंच किरण बांदूरकर, माजी पंस उपसभापती निरीक्षण तांड्रा, उत्तर भारतीय मोर्चाचे संजय तिवारी, हेमंत उरकुडे, वाहतूक आघाडीचे विनोद चौधरी, रत्नेश सिंग, भाजपा युवामोर्चाचे अमोल थेरे, माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, प्रकाश बोबडे, माजी जिप सदस्य चिन्नजी नलभोगा, माजी तंमुस अध्यक्ष मल्लेश बल्ला, हसन शेख, भाजपा नेते बबलू सातपुते, प्रवीण सोदारी, दिलीप कांबळे, हेमराज बोंबले, शाम आगदारी, पारस पिंपळकर, धनराज पारखी, रवी चुने,मधुकर धांडे, सुरेंद्र झाडे, राजेंद्र लुटे, भारत साळवे, रोहित सोनटक्के, सुशील डांगे, माजी ग्रामपंचायत सदस्या सुचिता लुटे, श्रीमती निशा उरकुडे, घुग्घुस सीडीसीसी बँक सखी सुनीता बावणे, विनोद खेवले, सुनील राम, गुड्डू तिवारी, विनोद जंजर्ला, अतिश मेळावार, सतीश कामतवार, मुकेश कामतवार उपस्थित होते.
संचालन माजी ग्रामपंचायत सदस्य साजन गोहणे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन श्री. देवरावदादा भोंगळे मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies