शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक नंदूू पढाल व भा वि सेना माजी शहर प्रमुख घनश्याम आस्वले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !
चंद्रपूर : शुक्रवार दिनांक ८ मे २०२१ रोजी चंद्रपुरातील ख्रिस्तानंद हॉस्पिटल येथे डॉक्टर असलेले डॉ. रफिक निजामी सह अन्य पाच लोकांना रेमीडीसिव्हीर इंजेक्शन काळ्याबाजारात विकताना पोलिसांनी अटक केली . अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दोन ख्रिस्तानंद हॉस्पिटलच्या नर्सेस आहेत. यासह अन्य दोन आरोपींना म्हणजे एकंदर पाच आरोपींना रेमीडीसीव्हीरची काळ्याबाजारात मोठ्या दराने विक्री करताना चंद्रपूर पोलिसांनी रंगेहात अटक केली. आरोपींवर चौकशी अंती FDA कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. महत्वाचे म्हणजे ज्यावेळी या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यावेळी कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना रेमडेसिवर इंजेक्शन चा फार तुटवडा होता, त्यावेळेसच हा प्रकार चंद्रपूरात घडला. मे महिन्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांचा मृत्यू हा मोठ्या प्रमाणात झाला असून ज्या रुग्णांना रेमीडीसिव्हीर ची आवश्यकता होती त्या रुग्ण व्यतिरिक्त तो बाहेर विकल्या जात होता या चंद्रपुरातील क्रिस्तन हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे, त्याच रुग्णालयात डॉक्टर निजामी हे कार्यरत होते व त्यांच्यासोबत असलेल्या नर्स सहित याच रुग्णालयात कार्यरत होत्या. डॉक्टरांच्या बेजबाबदारपणामुळे व मोठी रक्कम मिळविण्याच्या लालसेने हा गैरप्रकार करण्यात आला याची सखोल चौकशी करून डॉक्टर रफिक निजामी व अन्य आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी यानिमित्ताने करण्यात येत आहे.
महत्वाचे म्हणजे कोरोना संक्रमण काळात रेमेडेसिविर इंजेक्शन रूग्णांसाठी जीवनदायिनी चे काम करीत होते, त्याच वेळेस हा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्यात आला यामध्ये एखादा डॉक्टर शामिल असेल तर ही बाब दुर्दैवाची आहे. सर्व बाबीचा विचार करून व त्याची सखोल चौकशी करून चंद्रपूर जिल्ह्यातील रेमेडीसिवर इंजेक्शन चा तुटवडा निर्माण करून ते इंजेक्शन काळ्याबाजारात विकण्यात सामील असलेल्या डॉक्टर व अन्य आरोपींवर सदोष मनुष्यवधाच्या गुन्हा त्वरीत दाखल करण्यात यावा.अशी मागणी शिवसेना भद्रावती शहर प्रमुख नंदूभाऊ पढाल व भा वि सेना माजी शहर प्रमुख घनश्याम आस्वले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री यांना जिल्हाधिकारी मार्फत पत्र पाठवून केली.