Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्‍या प्रयत्‍नांनी व्‍यापा-यांसाठी जलाराम भवन येथे लसीकरण मोहीम सुरू



मागील काही दिवसात व्‍यापा-यांचे शिष्‍टमंडळ आ. सुधीर मुनगंटीवार यांना भेटावयास आले असता त्‍यांनी बाकी समस्‍यांसोबतच व्‍यापा-यांसाठी विशेष लसीकरण मोहीम चालविण्‍याची मागणी केली. व्‍यापा-यांच्‍या शिष्‍टमंडळाने व्‍यापा-यांना कोविड योध्‍दा समजून त्‍यांचा त्रास बाकीच्‍यांना होवू नये यासाठी लवकरात लवकर विशेष लसीकरण मोहीम चालवावी अशी मागणी केली.



त्‍याचवेळी आ. मुनगंटीवार यांनी लवकरच असे सेंटर सुरू करण्‍याचे निर्देश महानगरपालिका चंद्रपूरला दिले. त्‍यास अनुषंगाने आज जलाराम भवन चंद्रपूर येथे फेडरेशन ऑफ ट्रेड, कॉमर्स आणि इंडस्‍ट्रीज व चंद्रपूर महानगरपालिका यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने व्‍यापारी व त्‍यांच्‍या कुटूंबियांसाठी विशेष लसीकरण मोहीम सुरू करण्‍यात आली. याप्रसंगी बोलताना आ. मुनगंटीवार यांनी या मोहीमेला शुभेच्‍छा दिल्‍या व पुढील काही दिवसात नियमानुसार १८ ते ४५ या वयोगटासाठी सुध्‍दा लसीकरण मोहीम सुरू करण्‍याचे आश्‍वासन दिले.



याप्रसंगी महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, नगरसेवक संजय कंचर्लावार, राजेंद्र अडपेवार, फेडरेशन ऑफ ट्रेड, कॉमर्स आणि इंडस्‍ट्रीज चे अध्‍यक्ष रामकिशोर सारडा, सुमेश कोतपल्‍लीवार, अनिल टहलियानी, पंकज शर्मा, राजेश सादराणी, प्रभाकर मंत्री, रामजीवन परमार, मधुसुदन रूंगठा, दामोधर सारडा, दिनेश बजाज, संतोष चिल्‍लरवार, गिरीष चांडक व गिरीष उपगन्‍लावार यांची उपस्थिती होती. जलाराम सेवा मंडळाने हे सभागृह निःशुल्‍क उपलब्‍ध करून दिल्‍याबद्दल मनीषभाई सुचक व रवी कारिया यांचे याप्रसंगी आभार मानण्‍यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies