चंद्रपूर शहरातील प्रभाग क्रमांक 3 इंदिरानगर येथील वस्तीतून एक मोठा नाला वाहात आहे या नाल्याला जंगलातील पाणी व परिसरातील पाणी वाहत असते नाल्याचा गाळ उपसा व स्वच्छता न झाल्यामुळे पावसाळ्यामध्ये हा नाला पूर्णपणे पाण्याने भरतो व नाल्या लगत असलेल्या घरामध्ये यांचे पाणी जाते त्यामुळे नागरिकांचे नुकसान होऊ शकते याकरिता भविष्यातील पूर परिस्थिती टाळण्यासाठी इंदिरानगर प्रभागातील मोठ्या नाल्याचा गाढ उपसून सफाई करण्यात यावी याकरिता आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे विभाग अध्यक्ष तुषार येरमे यांनी महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांना निवेदनाद्वारे मागणी केली