चंद्रपूर : जिल्हा दारूमुक्ती कृती समिती चंद्रपूर तर्फे जिल्ह्यातील दारूबंदी राज्य शासनाने उठविल्यानंतर गुरुदेव सेवा मंडळातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निषेध नोंदविला. चंद्रपुर जिल्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी आहे.जीवनभर त्यांनी मद्यप्राशन चा विरोध करीत व्यसनमुक्ती साठी जीवन दिले.हेच नाहीतर व्यसनमुक्तीचे समर्थन करणारे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पावन झाली.त्या भूमीतील मातृशक्तीने क्रांतिभूमी चिमूर ते नागपूर विधानभवन पायपीट करीत दारूचा विरोध दर्शवित दारूबंदीची मागणी केली.दारूमूळे उध्वस्त होणारे संसार वाचवा.कपाळाचं कुंकु शाबूत ठेवा अशी मागणी करीत एल्गार पुकारला.आणि याची दखल घेत २०१५ ला दारूबंदी लागू झाली.याचे गुरुदेव भक्तांनी स्वागत केले.परंतु महाविकास आघाडी सरकारने एका कॅबिनेट मंत्र्याच्या अट्टहासापोटी दारूबंदी उठविण्याचा निर्णय घेतला,ही बाब जिल्ह्यातील सर्व मातृशक्तीचा अपमान करणारी आहे.आम्ही या निर्णयाचा व पालकमंत्र्यांचा तीव्र निषेध करतो.दारुबंदीसह व्यसनमुक्ती धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करा अशी मागणी त्यांनी केली.
गुरुदेवभक्तांनी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले.यावेळी चंद्रपूर जिल्हा दारूमुक्ती कृती समितीचे जिल्हा प्रमुख व गुरुकुंज आश्रम मध्यवर्ती प्रतिनिधी विजय चिताडे,मध्यवर्ती प्रतिनिधी अन्याजी ढवस,गुरुदेव सेवा मंडळचे देवराव बोबडे,गुरुदेव सेवाधिकारी धर्माजी खंगार, गुरुदेव सेवा मंडळ उपाध्यक्ष माया मांदाडे,महिला प्रतिनिधी प्राचार्य प्रज्ञा गंधेवार,वसंतराव धंदरे,अवघडे गुरुजी,अरविंद मडावी,पुरुषोत्तम सहारे, आनंदराव मांदाडे,रमेशराव ददगाल,विजय ठकरे,मंजुश्री कासंगोट्टूवार, आशा देऊळकर, शुभांगी दिकोंडवार,सुनीता भांडे,अनिता सिंग,साधना दुरडकर,मंगला सिडाम,सिमा मडावी,गीता गेडाम,नीता रामटेके,विभा मेश्राम,कल्पना गिरडकर, आदिवासी नेते धनराज कोवे ,यांची उपस्थिती होती.