Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

ओबीसी समाजाच्‍या हक्‍कासाठी भाजपाचा लढा सुरूच राहणार – आ. सुधीर मुनगंटीवारमहाविकास आघाडी सरकारच्‍या विरोधात भाजपाचे आक्रोश आंदोलन

भाजपा कार्यकर्त्‍यांनी वाहिली लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना श्रध्‍दांजली

याआधी जेव्‍हा भाजपा-शिवसेना सरकार होते तेव्‍हा ओबीसी साठी स्‍वतंत्र मंत्रालय स्‍थापन केले. त्‍यामुळे ओबीसी समाजाबद्दल भाजपाला नेहमीच आस्‍था राहिली आहे. नुकतेच सर्वोच्‍च न्‍यायालयाने ओबीसी समाजाकरिता असलेले राजकीय आरक्षण रद्द केले. ही अतिशय दुःखद बाब आहे. महाविकास आघाडी सरकारने कोर्टामध्‍ये ओबीसी समाजाची बाजू योग्‍य पध्‍दतीने न मांडल्‍यामुळे हे आरक्षण रद्द झाले. या आधी मराठा आरक्षण व आता ओबीसी आरक्षण रद्द झाल्‍यामुळे महाविकास आघाडी सरकार संवेदनहीन असल्‍याचे दिसुन आले आहे. या गोष्‍टीचा भाजपा निषेध करीत आहे. ओबीसी समाजाच्‍या हक्‍कासाठी भाजपाचा लढा सुरूच राहणार असे प्रतिपादन, भारतीय जनता पार्टी चंद्रपूरतर्फे जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर गुरूवार (३ जून) ला आयोजित आंदोलनात बोलताना विधीमंडळ लोकलेखा समिती अध्‍यक्ष तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. यावेळी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्‍यांनी लोकनेते गोपीनाथ मुंडे यांना त्‍यांच्‍या तृतीय पुण्‍यतिथीनिमीत्‍त श्रध्‍दांजली वाहिली.


यावेळी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे राष्‍ट्रीय उपाध्‍यक्ष व माजी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर, माजी आमदार अॅड. संजय धोटे, सुदर्शन निमकर, भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष (श) डॉ. मंगेश गुलवाडे, ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारीणी सदस्‍य प्रा. प्रकाश बगमारे, ओबीसी मोर्चा जिल्‍हा संयोजक अविनाश पाल, महानगर ओबीसी मोर्चा अध्‍यक्ष विनोद शेरकी, उपमहापौर राहूल पावडे, भाजपा महामंत्री राजेंद्र गांधी, सुभाष कासनगोट्टूवार, रविंद्र गुरनुले, संजय गजपूरे, क्रिष्‍णा सहारे, जि.प. सभापती नागराज गेडाम, मुल पंचायत समितीचे सभापती चंदू मारगोनवार, भाजपा महिला आघाडी अध्‍यक्षा अलका आत्राम, पं.स. सभापती रामलाल दोनाडकर, विवेक बोढे, रामपाल सिंग, प्रदिप किरमे, विठ्ठलराव डुकरे, राजेंद्र अडपेवार, वसंता देशमुख, दिनकर सोमलकर, सचिन कोतपल्‍लीवार, शिला चव्‍हाण, माया उईके, कल्‍पना बगुलकर, निळकंठ मानापूरे, ज्‍योती बुरांडे, नारायण हिवरकर यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

आ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, न्‍यायालयाने वारंवार निर्देश देवून आणि भाजपाच्‍या पाठपुराव्‍यानंतरही महाविकास आघाडी सरकारकडून राज्‍य मागासवर्ग आयोग स्‍थापन करण्‍यात चालढकल सुरूच आहे. हा आयोग स्‍थापन करून सर्वोच्‍च न्‍यायालयाकडे मुदत मागीतली असती तर स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमधील आरक्षण रद्द करण्‍याची वेळच आली नसती. राज्‍य सरकारच्‍या या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्‍टात आले आहे. भाजपा सर्व समाजाला घेवून पुढे जाणारा पक्ष आहे. परंतु ज्‍या गोष्‍टी याआधी हक्‍काने त्‍या त्‍या समाजाला मिळाल्‍या त्‍या तशाच ठेवून व कायद्याच्‍या चौकटीत बसवून आता ओबीसींना न्‍याय देण्‍यात यावा. महाविकास आघाडी सरकार सर्वच बाबतीत अपयशी ठरले असून भाजपा ओबीसी समाजाच्‍या पाठीशी ठामपणे उभी आहे. ओबीसी समाजाला न्‍याय मिळवून देण्‍यासाठी भाजपा कटिबध्‍द असून या समाजाच्‍या मागण्‍या मान्‍य न झाल्‍यास आंदोलन अधिक तिव्र करण्‍यात येईल, असा गर्भीत ईशारा त्‍यांनी दिला.

याप्रसंगी भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे राष्‍ट्रीय उपाध्‍यक्ष व माजी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर यांनी महाविकास आघाडी सरकारवर कडाडून टिका केली. ओबीसींचे राजकीय आरक्षण परत मिळवून देण्‍यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबध्‍द आहे. सरकारवर विविध पध्‍दतीने दबाव आणून आम्‍ही हे आरक्षण परत मिळविण्‍याचे पूर्ण प्रयत्‍न करू. याप्रसंगी प्रास्‍ताविकात भाजपा जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे यांनी महाविकास आघाडी सरकारचा जोरदार घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला. महाविकास आघाडी सरकार ओबीसी समाजालाच नाहीतर कोणत्‍याही समाजाला न्‍याय मिळवून देवू शकले नाही. एवढेच नाहीतर हे सरकार कोरोनाच्‍या संकटातही जनतेच्‍या पाठीशी नाहीत हे स्‍पष्‍ट झाले आहे. अशा सरकारचा सर्वसामान्‍य जनतेनेही निषेध नोंदविला पाहीजे असे ते म्‍हणाले. यावेळी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार व माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांच्‍या नेतृत्‍वात भाजपाच्‍या शिष्‍टमंडळाने जिल्‍हाधिकारी मार्फत मुख्‍यमंत्र्यांना निवेदन सादर केले.

कार्यक्रमाचे संचालन भाजपा ग्रामीण ओबीसी आघाडी अध्‍यक्ष अविनाश पाल यांनी केले तर महानगर ओबीसी मोर्चा अध्‍यक्ष विनोद शेरकी यांनी आभार मानले. या आंदोलनात अॅड. सारिका सुंदरकर, वंदना संतोषवार, मंजुश्री कासनगोट्टूवार, प्राचार्य प्रज्ञा बोरगमवार, राजेंद्र तिवारी, पुनम तिवारी, राजेंद्र खांडेकर, अरूण तिखे, शुभांगी दिकोंडवार, दिक्षा सुर्यवंशी, विलास खटी, प्रशांत चौधरी, संदीप आवारी, मधुकर राऊत, प्रभा गुडधे, रामजी हरणे, सुरेश कलोजवार, श्रीनिवास जनगम, सुरज पेदुलवार, विजय वानखेडे, सतिश धोटे, पारस पिंपळकर, आशिष देवतळे, नरेंद्र जिवतोडे, सुनिल नामोजवार, सुरेश केंद्रे, केशव गिरमाजी, दत्‍ता राठोड, अमोल देवकाते, विनोद देशमुख, रणजीत पिंपळशेंडे, राजू ठाकरे, प्रविण ठेंगणे, संदीप उईके, विनोद चौधरी, हेमंत उरकुडे, प्रविण सातपुते, किशोर गोवारदीपे, प्रशांत डाखरे, यशवंत वाघ, शेखर चौधरी, नैलेश चिंचोळकर, तुळशिराम रोहणकर, प्रदिप पिंपळशेंडे, अजय मस्‍की, बालाजी माने, एकनाथ थुटे, बबनराव निकोडे, डॉ. भगवान गायकवाड, अनिल डोंगरे, सुरेश महाजन, विनोद गोहोकरे, रमेश परबत, कमलाकर किन्‍हेकर, राजेश साकुरे, गणपती चौधरी, भानेश येग्‍गेवार, दिवाकर गेडाम, रवि बुरडकर, सुधीर सेलोकर, सुधाकर उलेमाले, शशिकांत मस्‍के, चंदन पाल यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies