माझा वार्ड-माझी जवाबदारी अंतर्गत निःशुल्क सॅनेटायझेशन
अष्टपैलू क्रीडामंडळ व नमस्ते चांदा फाउंडेशनचा संयुक्त उपक्रम
येथील अष्टपैलू क्रीडा मंडळ व नमस्ते चांदा फाउंडेशन च्या पुढाकारातून *माझा वार्ड माझी जवाबदारी'* असा एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे.आपला वार्ड कोरोनामुक्त असावा म्हणून ही संकल्पना अष्टपैलू क्रीडा मंडळचे अध्यक्ष प्रज्वलंत कडू यांनी मांडल्यावर काही युवकांनी पुढाकार घेत या उपक्रमाची महाकाली वार्ड येथून सुरवात केली आहे.
यात प्रामुख्याने नमस्ते चांदा फाउंडेशनचे प्रीतम खडसे, चेतन इंगोले यांचेसह पंकज निमजे,अक्षय नव्हाते,अक्षय बल्लावार ,रौनक शर्मा, श्रीकांत येलपुलवार, कुणाल निकोडे, विवेक शेंडे, गणेश पचारे, आदित्य रामटेके यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
सर्वत्र कोरोनाने थैमान घातलेला असताना शासनाने "माझे कुटुंब माझी जबाबदारी " असा गुरुमंत्र देत जनतेला सजग केले. याच पार्श्वभूमीवर अष्टपैलू क्रीडा मंडळ व नमस्ते चांदा फाउंडेशन ने जनतेला मदतीचा हात देणे सुरू केले.आणि "माझा वार्ड माझी जवाबदारी"या संकल्पनेने जन्म घेतला. आपल्या वार्डातील एखाद्या कुटुंबात कोरोनारुग्ण आढळून आल्यानंतर आजूबाजूच्यांची तारांबळ उडते, आणि जो तो एकमेकाकडे आपसुकच शंकेच्या नजरेने बघू लागतो. त्यामुळे आपसातील विश्वास ढासळू नये व संसर्ग होऊन कोरोना पसरू नये या उदात्त हेतूने संपूर्ण परिसर निर्जंतुकीकरण(सॅ निटाइझ) करण्या साठी महाकाली वार्डातील युवक पुढे आले. आतापर्यंत ओमनगर- महाकाली वार्डातील किमान 50 घरांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले असुन महानगरातील कोणी व्यक्ती या कामासाठी बोलावत असेल तर आम्ही ही सेवा निशुल्क देण्यास तयार आहोत अशी माहिती प्रसिद्धी पत्रकातून अष्टपैलू क्रीडा मंडळाचे अध्यक्ष प्रज्वलंत कडू यांनी दिली आहे. परिसरातील युवकांनी आपला वार्ड कोरनामुक्त करण्यास पुढाकार घ्यावा असे आव्हान प्रज्वलंत कडू यांनी केले आहे.सद्या हि सेवा महाकाली वार्ड येथे दिली जात आहे अशी माहिती नमस्ते चांदाचे प्रीतम खडसे यांनी दिली आहे.इच्छुकांनी 7744899998,9823748979 यावर संपर्क साधावा असे आवाहन चेतन इंगोले यांनी केले आहे.