एक आठवड्यापूर्वी परराज्यातून आलेल्या "त्या" दारूच्या खेपेला वाली मात्र बिनधास्त !
एक आठवड्यापूर्वी चंद्रपूर शहरांमध्ये "दिव-दमन" येथून दारूची मोठी खेप चंद्रपुरात दाखल झाली. याबद्दलची माहिती चंद्रपूर जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना होती, परंतु त्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. परराज्यातून जिल्ह्यात दाखल झालेल्या या दारू खेपेचा तस्कर हा जिल्ह्यातील दारू तस्करीचा मोठा मासा असल्यामुळे त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही ही अशी चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. "गोवा-दिव-दमन" या परराज्यातून "विशाल" प्रमाणात जिल्ह्यात साठा येत असेल तर व जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना च्या नावाने घरात बसण्यास सांगण्यात येत असेल ही गंभीर बाब आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या बाबतीत गंभीर दखल घेऊन सदर प्रकरणाची त्वरित चौकशी करावी व या दारू तस्कर तील मोठ्या मास्यावर आपला जाळ अवश्य आवळायला हवा. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही सदर प्रकरणाला लावून धरावे अशी अपेक्षा सुज्ञ नागरिक करीत आहे.
राजा " च्या "दारुच्या खेपा" खुलेआम होत आहेत चंद्रपूरात दाखल !
पोलिसांच्या आशीर्वादाने नियमांचे होत आहे उल्लंघन !
आता कुठे गेले कोरोनाचे निर्बंध, नागरिकांचा सवाल !"
चंद्रपूर : चंद्रपूरात राजा ठाकूर या दारू तस्करांच्या दारू साठा सर्रासपणे पोहोचता होत आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोरोणा संदर्भात कडक निर्देशांचे पालन होत असतांना मात्र चंद्रपूर शहरामध्ये "राजा ठाकूर" या दारू तस्करांच्या दारू नित्यनेमाने त्याला मिळत आहे, आणि त्याच्या पुरवठाही होत आहे, ही आश्चर्याची बाब असून परत जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास ची आवश्यकता असतांना चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पर जिल्ह्यातून परप्रांतातून होत असलेला दारू पुरवठा हा चिंतेचा विषय आहे. कोरोनासंदर्भातील नियम हे फक्त सर्वसामान्यांसाठीचं आहेत कां? असा गंभीर प्रश्न यानिमित्ताने उभा ठाकला आहे.
हाती आलेल्या सूत्रानुसार, शहरातील हेमंत करकरे चौकातील पोलीस ठाणे अंतर्गत राजा ठाकूर यांचे निवास आहे तर रामनगर पोलीस पोलिस हद्दीतील कपिल चौक परिसरात राजा ठाकूर व त्यांच्या साथीदाराचे कार्य स्थान असल्याचे सांगण्यात येते. यामुळे प्रामाणिक पोलिसांना कारवाई करताना त्रास सहन करावा लागतो. शहर पोलीस ठाणे व रामनगर पोलीस ठाणे या दोन्ही हद्दीत कागदोपत्री कार्यरत असलेली राजा ठाकूर व त्याची गॅंग सुरळीतपणे आपले कामकाज करीत आहे. बावा गुप्ता, गुप्ता बंधू आणि अन्य असे या गॅंग चे स्वरूप आहे. दोन वर्षापूर्वी दारु तस्करी मध्ये सक्रिय असलेला चर्चित अमित गुप्ता हा या टोळीचा म्होरक्या असल्याचे सांगण्यात येते. परवानगी देतांना (दारूसाठी परवानगी या शब्दाचा सीबीआय तपास व्हायला हवा. ही परवानगी देतो कोण याचा शोध महत्वाचा आहे.) ती परवानगी राजा ठाकूर यांच्या नावाने देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. राजा ठाकूर हा देखावा असून त्यापाठीमागे असणारा मुख्य दारू तस्कर हा संपूर्ण शहरांमध्ये हे आपले मोठे नेटवर्क उभारून या काळामध्ये ही कार्यरत आहे, व दारूच्या पुरवठा मोहल्ला कमिटी ला अजूनही या दारू तस्करांच्या माध्यमातून सुरळीतता सुरू आहे. या राजा ठाकूरच्या मुसक्या आवळण्यात पोलीस किती यशस्वी होतात हे येणाऱ्या काही दिवसात कळेलच.
राजा ठाकूर च्या नावाने पडद्यामागे असलेल्या दारू तस्कर आला अभय कोणाची आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे. कोरोणा संक्रमणाच्या नावाखाली सामान्यजनांना घरी बसविण्यात आले आहे मग दारू तस्करांवर कारवाई करण्यात जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासन कां बरे लाचार आहे, हा संशोधनाचा विषय आहे.