बल्लारपुर : बल्लारपूरात मागील काही दिवसांपासून शहराच्या विविध ठिकाणी चोरी होत असल्याची बोंब उडत होती. दरम्यान काही जणांची दुचाकी आणि इतर साहित्य सुद्धा चोरी झाल्याचे माहिती समोर आली असतांना या चोरीतील आरोपींना बल्लारपूर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्यावर अपराध क्रमांक ५०५/२०२० भां.द.वि.कलम ३७९ या गुन्ह्यांअन्वये कारवाई करण्यात आली आहे. सदरच्या आरोपींबद्दल पोशी अजय हेडाऊ व पोशी गणेश पुरडकर यांना गुप्त माहिती मिळाली असता सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या चमूने एका आरोपी व दोन विधिसंगर्ष ग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान पोलिसांसमक्ष आरोपींनी गुन्हा कबूल केला असून आरोपी १) संतोष राठोड वय १८ वर्ष राहणार काटा गेट जवळ बल्लारशहा, चंद्रपुर यास दिनांक १६ में २०२१ रोजी अटक करून पोलिस कोठडी दरम्यान त्याचा कौशल्य पुर्ण तपास करुन एकुण ३ गुन्हे उघडकीस आनले आहे. .
सदर आरोपीकडून १५,०००/-रू ची काळ्या हिरोहोंडा सिडी डीलक्स MH 34-AC-7157, २०,०००/-रु ची काळ्या रंगाची हिरो पॅशन प्रो.MH-34-AL-6571, २५,०००/-रु ची काळ्या रंगाची होंडा ड्रीम युगा MH-34-AX-3648, १५,००० /- रु.ची लाल काळ्या रंगाची हिरोहोंडा सिडी डिलक्स MP-45-MB-4467 असा एकूण ७५,०००/- रुपये किमतीच्या एकुण चार मोटरसायकल मिळुन आल्या.या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक उमेश पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास गायकवाड, पोहवा.आनंद परचाके, एनसीपी सुधाकर वरघणे, शरद कुडे, राकेश पोशी, अजय हेडाऊ, श्रीनिवास वाभीटकर, गणेश पुरडकर, शेखर माथनकर, महिला शिपाई संध्या आमटे, सिमा पोरते आदींनी केली आहे.