Hot Widget

Type Here to Get Search Results !

Subscribe Us

मनपा मध्ये कर्मचाऱ्यांच्या मुजोऱ्या !वरिष्ठांचे आदेश नसतांना ही सुरू आहे मनमानी !


चंद्रपूर शहर महानगरपालिका विविध कारणाने नेहमी वादात राहिली आहे. कोविड-19 च्या काळात महत्वाची भूमिका बजावणारी महानगरपालिका ही जनसामान्यांसाठी जीवनदायिनी च्या रूपात समोर यायला हवी. परंतु मनपा मध्ये कार्यरत असलेले कर्मचारी हे आपल्या मुजोरीमुळे व आपल्या मनमानी कारभारामुळे महानगरपालिकेला बदनाम करण्याच्या मार्गावर लागले आहे असे चित्र दिसत आहे.
15 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती सर्व शासकीय विभागात अनिवार्य आहे. फक्त वरिष्ठ अधिकारी आपले कर्तव्य बजावण्यासाठी उपस्थित राहत असतात. कोणत्याही अभ्यागतांना विशीष्ठ कामाशिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटता येत नाही. हा शासकीय दंडक आहे. परंतु प्रत्येक विभागाचे आवक-जावक विभाग सुरू आहेत. आलेल्या तक्रारी, निवेदने स्विकारण्यासाठी आवक जावक विभाग एक महत्त्वाची भूमिका बजावित असतो.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेमध्ये आवक-जावक विभागात यासंदर्भात एक वेगळाच अनुभव बघायला मिळाला. नुकतेच माहिती अधिकारात एका अर्जदाराने अर्ज केला. मनपा मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाप्रमाणे मुख्य द्वारा जवळ एक बॉक्स ठेवला आहे. त्यात आपला अर्ज टाका, अशी भूमिका मनपा च्या आवक-जावक विभागातील कर्मचाऱ्यांनी चक्क आम्ही अर्ज घेतो पण रिसीव्ह्ड देत नाही, अशी पुष्टी जोडली. होऊ शकते वरिष्ठांनी हा आदेश दिला असेल म्हणून अर्जदारांनी आवक-जावक विभागाला अर्ज देऊन परत फिरले. यासंदर्भात चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त राजेश मोहिते यांना विचारणा केली असता असा कोणताच आदेश निर्गमित केलेला नसून आवक-जावक विभागाने अर्जदाराला रिसीव्ह द्यायला हवी, असे घडले असल्यास ते चुकीचे आहे. आज आपण एका कामानिमित्त नागपूरला असल्यामुळे उद्याला याबाबतीत अवश्य दखल घेऊ. अशी माहिती दिली.
महत्त्वाचे म्हणजे कोविड काळामध्ये अधिकारी ही प्रामाणिक आहे परंतु कर्मचारी आपली जबाबदारी झटकून स्वतःची मनमानी करीत आहे. यामध्ये विभाग बदनाम होत आहे आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्यांची व त्या विभागातील जबाबदार वरिष्ठ अधिकारी ची विशेषत: होणारी बदनामी यासाठी कनिष्ठ कर्मचारी जबाबदार आहेत. महानगरपालिकेमध्ये आलेला हा अनुभव हे सिद्ध करून जातो. महानगरपालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त राजेश मोहिते यांनी अशा बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करावी, ही मागणी यानिमित्ताने उभी होत आहे. समोर आलेली ही बाब फक्त महानगरपालिके पुरती मर्यादित नसून जिल्ह्यातील प्रत्येक विभागातील कनिष्ठ कर्मचाऱ्यांकडून अशा घटना घडत आहेत त्यावर लक्ष देणे हे गरजेचे आहे.

सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे कोणत्याही विभागात कार्यरत असलेले वरिष्ठ अधिकारी हे काही वर्षासाठी त्या पदावर असतात परंतु त्यांच्या अंतर्गत कार्यरत असलेले कनिष्ठ कर्मचारी यांच्या त्यांच्या त्या जिल्ह्याशी हा नेहमीच्या संपर्क व नेहमीचेचं एक लोक असतात. कनिष्ठ कर्मचाऱ्यांनी फक्त त्यांचे कर्तव्य जोपासायला हवे. अधिकारी आज आलेत आणि उद्या गेलेत. अशी त्यांची स्थिती आहे परंतु कर्मचाऱ्यांनी कर्तव्यासोबत माणुसकी जोपासणे गरजेचे आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात रिसिव्ह्ड मागुन पहा !!
या संबंधात अर्जदाराने रिसीव मिळावी असा आग्रह केला असता जिल्हाधिकारी कार्यालयात रिसोव्ह्ड मागून पहा. अशी पुस्ती जोडत अर्जदाराला हुसकावणी दिली. ही बापू मुजोरीपणाची हद्द पार करणारी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies